Dhananjaya Mahadik : इच्छापूर्ती झाली; अन् खासदार महाडिकांनी घातला शनी शिंगणापूरला अभिषेक !

Dhananjaya Mahadik : महाडिकांनी शनिदेवाला विधिवत अभिषेक करुन नवसपुर्ती केली.
Dhananjaya Mahadik
Dhananjaya Mahadik Sarkarnama

सोनई : कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांचे चिरंजीव विश्वराज महाडीक यांची भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानिमित्त त्यांनी आज कुटुंबासह शनिदेवाला विधिवत अभिषेक करुन नवसपुर्ती केली.

यावेळी मुलानीमाथा परीसरात त्यांचे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर उदासी महाराज मठात चिरंजीव विश्वराज महाडीक (Vishwaraj Mahadik) हे कारखान्याचे अध्यक्ष झाले व महाडिक हे खासदार झाल्याबद्दल सपत्नीक पुजा त्यांनी केली.

Dhananjaya Mahadik
Satyajeet Tambe यांनी पाठिंबा मागितलेला नाही, ते आल्यास विषय पार्लमेंटरी बोर्डाकडे जाईल !

मुलाने सहकारात घेतलेली एन्ट्री यशस्वी व्हावी म्हणून संकल्प करत कार्यसिद्धी पूजन व तेल अभिषेक शनिदेवाला केला. तसेच शनैश्वर देवस्थानच्यावतीने सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देवून सत्कार केला.

Dhananjaya Mahadik
Vishwajeet Kadam : विश्वजीत कदमांना वाढदिवसाची मोठी भेट

दरम्यान, ''खासदारकीच्या अगोदर शनिदर्शनाला आलो होतो. सारं मनासारखं झाल्याने आज आवर्जून दर्शनासाठी आलो. येथील दर्शनाने कामाला उर्जा मिळते'', असे खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com