Shivsena; हेमंत गोडसेंना कचऱ्याच्या डब्यात टाकू!

शिवसेनेने शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे टक्केवारीवाले व कागदी घोडे नाचवणारे खासदार असल्याची टिका केली.
Vijay Karanjkar & Hemant Godse
Vijay Karanjkar & Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान देऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या शिवसेनेशी (Shivsena) पंगा घेतला आहे. त्यांना आम्ही नंगा केल्याशिवाय सोडणार नाही. त्यांना आम्ही कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. त्यांनी ज्या ताटात खाल्ले, त्यातच घाण केली. त्यांना यापुढे माफी नाही, अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी खासदार गोडसे यांनी आव्हान दिले आहे. (Angry Shivsena leaders given open challange to Shinde group`s Hemant Godse)

Vijay Karanjkar & Hemant Godse
Sanjay Raut; हिंमत असेल तर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये निवडणूक लढवावी!

खासदार गोडसे यांनी खासदार राऊत यांनी नाशिकमध्ये निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले होते. त्याची तीव्र प्रतिक्रीया शिवसेनेत उमटली. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख करंजकर, गटनेते विलास शिंदे, अजय बोरस्ते यांसह सर्वच नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन गोडसे यांचे अक्षरशः वस्त्रहरण केले. त्यामुळे खासदार गोडसे व शिवसेनेच्या नेत्यांत चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

Vijay Karanjkar & Hemant Godse
Dada Bhuse; पालकमंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करा!

श्री. करंजकर म्हणाले, दोन्ही वेळेला नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर होण्यास पंधरा- पंधरा दिवस उशीर झाला होता. राज्यातील विविध मतदारसंघातील उमेदवार जाहीर होत असत, मात्र नाशिकचा उमेदवार जाहीर होत नसायचा. मागच्या वेळी देखील तसेच झाले होते. मी स्वतः मनाचा मोठेपणा दाखवून त्यावेळी पक्षप्रमुखांना मी विनंती करून हेमंत गोडसे यांना उमेदवारी द्या, आम्ही त्याला निवडून आणू असे सांगितले होते.

असे असताना देखील, खासदार गोडसे यांनी ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कामे असतील,ती त्यांनी केली नाही. अन्य पक्षाचेतसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुचविलेली कामे करायची, ही त्यांची पद्धत राहिली आहे. एकीकडे मी हिदूत्वाच्या विषयासाठी शिंदे गटात गेलो असे सांगायचे. मात्र दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कामांना निधी द्यायचा, कारण त्यात टक्केवारी असायची. या आर्थिक कारणांकडे मी काही लक्ष देत नव्हतो.

श्री. करंजकर पुढे म्हणाले, हिंदुत्वाचा मुद्दा जर त्यांना महत्त्वाचा वाटत होता, तर आज संपुर्ण राज्यात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा विषय एव्हढ पेटलेला असताना, हे तोंड का उघडत नाहीत?. राज्यपालांनी महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध देशाचे अराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. त्याबाबत त्यांनी एखादे आंदोलन करायला पाहिजे होते. तसे केले असते तर आम्हालीह अभिमान वाटला असता. खरचे हे हिदुत्ववादी आहेत. मात्र तसे झालेले नाही. त्यांची भूमिका भाजप सारखीच आहे. हे सर्व बेगडी हिदुत्ववादी आहेत. याचे त्यांच्याकडे काही उत्तर आहे का?, असेल तर त्यांनी ते द्यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com