Jal Jeevan Mission : 'जल जीवन'ची तक्रार थेट केंद्राकडे; पवारसाहेबांच्या शिलेदारानं भ्रष्टाचार दाखवतो, असं दिलं चॅलेंज!

MP Nilesh Lanke corruption in Jal Jeevan Mission work Ahilyanagar Union Jal Shakti Minister C. R. Patil : अहिल्यानगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामातील भ्रष्टाचाराची केंद्र सरकारकडे तक्रार.
MP Nilesh Lanke
MP Nilesh Lanke Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामांचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

खासदार लंके यांनी मंत्री पाटील यांना पत्र देताना, साहेब तुम्ही माझ्याबरोबर चला, कामात निकृष्टपणा कसा झाला असून, त्यातील भ्रष्टाचार दाखवतो, असं सांगितलं.

जनजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुर 79 योजनांपैकी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दहा योजना पूर्ण झाल्या आहेत. या कामांमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. तशा तक्रारीही आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज, आनंदनगर आणि अन्य आठ योजनांचे केंद्रीय समिती मार्फत ऑडिट केल्यास या कामांमधील भ्रष्टाचार (Corruption) उघड होणार आहे. मंत्री पाटील यांनी लवकरात लवकर या योजनांचे ऑडिट करावे, अशी मागणी खासदार लंके यांनी निवेदनात केली.

MP Nilesh Lanke
Guardian Minister Appointment : नांदेडचा बीड करायचा नाही; मंत्री मुंडे बंधू-भगिनीच्या पालकमंत्रीपदाचे अडथळे वाढले

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामांचे केंद्रीय समितीमार्फत ऑडिट करण्यासंदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे दोन ते तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी सांगितले.

MP Nilesh Lanke
Top 10 News : शरद पवारांना मोठा धक्का ; एकनाथ शिंदे स्वस्थ बसेनात, राज्यभर दौरा करणार? - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

चला, मी भ्रष्टाचार दाखवितो !

डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीतही खासदार नीलेश लंके यांनी या योजनेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. माझ्यासोबत चला, मी भ्रष्टाचार दाखवितो. भ्रष्टाचार नसेल, तर मी राजीनामा देतो, असे आव्हान दिले होते.

योजनेसाठी निकृष्ट पाईप

या योजनेसाठी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले आहेत. हे पाईप जमिनीमध्ये एक फुटावर गाडण्यात आले आहेत. कोट्यवधींचा निधी मंजूर होऊन पाच टक्के योजनांची कामेही दर्जेदार झालेली नाहीत. बिले काढण्यासाठी आणि टक्केवारीसाठी कामे करण्यात येणार असतील, तर योजना यशस्वी होणार नसल्याचेही दिशा समितीच्या बैठकीत खासदार लंके यांनी निदर्शनास आणून दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com