Nilesh Lanke 1
Nilesh Lanke 1Sarkarnama

Nilesh Lanke : खासदार लंके टोलवर थांबले; एक फोन फिरवला अन् टोल वसुली...

MP Nilesh Lanka stopped the toll collection due to incomplete work on the highway : सोलापूर महामार्गाचे काम अपूर्ण असताना देखील टोल वसुली केली जात होती. खासदार नीलेश लंके यांनी तक्रारीनंतर टोल वसूल करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर टोली वसुली थांबवण्यात आली.
Published on

Ahmednagar News : सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री (ता. श्रीगोंदा) येथील टोल नाक्यावर करण्यात येणारी टोल वसुली खासदार नीलेश लंके यांनी थांबविली. या रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच टोल वसूल करण्यात येत असल्याने खासदार लंके यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू, असा सज्जड दमच भरला. यानंतर कंपनीने देखील वसुली थांबवली.

अहमदनगरमधून जात असलेल्या महामार्गाची दैना झाली आहे. पावसामुळे, तर महामार्गांवर खड्डे पडलेत. रस्त्यांची ही दुरवस्था सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीला समोरे जाता हा मुद्दा सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढवणार असे दिसते आहे. यातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके सध्या चांगलेच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. प्रत्येक सार्वजनिक कामांवर त्यांची करडी नजर आहे.

कांदा आणि दूध (Milk) दरासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि अहमदनगर जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरून, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार लंके यांनी आता महामार्गांवरून टोल वसुलीला टार्गेट केले आहे.

Nilesh Lanke 1
Vaibhav Pichad : 'तिकीट मिळो न मिळो, विधानसभा लढायचीच'; पिचड कार्यकर्त्यांचा निर्धाराने लहामटे अस्वस्थ

अहमदनगर-सोलापूर मार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. काम अपूर्ण असतानाही टोल वसुली करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्याकडे याबाबत पूर्वीपासून तक्रारी येत होत्या. तक्रारींची सूर वाढल्याने शेवटी आज खासदार नीलेश लंके यांनी अहमदनगर-सोलापूर मार्गाने जामखेडकडे जात असताना बनपिंप्री टोलनाक्यावर धडक मारली. तिथे वाहनांकडून टोल वसुली करण्यात येत होती. खासदार लंके यांनी यावर रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच टोल वसुली कसली, याचा जाब कर्मचाऱ्यांना विचारला. यावर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखविले.

Nilesh Lanke 1
Sujay Vikhe : पारावरच्या गप्पा मारण्या इतकं सोपं आहे का? सुजय विखे का संतापले

खासदार लंके यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले. रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोल वसुली करण्याचे कारण काय, असा सवाल खासदार लंके यांनी केला. यावर अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबविण्यात येईल, असे अधिकाऱ्याने खासदार लंके यांना सांगितले. काम अपूर्ण असताना देखील केलेली ही टोलवसुली सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. खासदार लंके हा मुद्दा पुढे कसा लावून धरतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com