Nilesh Lanke and Rani Lanke : पदर खोचला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवली; राणी लंकेंचा भाकरी भाजता-भाजता सरकारला इशारा

Rani Lanke cooked food for the protestors : खासदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कांदा आणि दूध दरवाढीसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आहे. राणी लंके यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून पिठलं- भाकरी बनवलं.
Nilesh Lanke and Rani Lanke
Nilesh Lanke and Rani LankeSarkarnama
Published on
Updated on

Nilesh Lanke and Rani Lanke News : कांदा आणि दूध दरवाढीसाठी खासदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काढलेला मोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तळ ठोकून ठाण मांडून आहे. या आंदोलनात खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके देखील सहभागी झाल्या असून, त्यांनी मोर्चाच्या ठिकाणी पदर खोचत सहभागी आंदोलक आणि शेतकऱ्यांसाठी भाकरी-पिठलं बनवलं.

राणी लंके यांनी काही वेळातच बनवलेल्या भाकरी-पिठल्यांची चर्चा मोर्चा स्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर खासदार नीलेश लंके यांच्या सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचा देखील सहभाग वाढू लागला आहे. आंदोलनात शेतकऱ्यांच्या सहभागामुळे जिल्हा प्रशासन देखील सावध झालं असून, निर्णयासाठी वरिष्ठ पातळीवर हाचलाचींना वेग आला आहे.

"शेतकऱ्यांसाठी (Farmer) प्रशासन आहे. खासदार नीलेश लंके यांची मागणी रास्त आहे. ती मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारासमोर चूल मांडली. जिल्हाधिकारी यांच्या नावानं भाकरी भाजल्यात. आता माघार नाही", अशी प्रतिक्रिया राणी लंके यांनी दिली.

Nilesh Lanke and Rani Lanke
Nilesh Lanke : खासदार लंकेंनी घातली गळ्यात कांद्याची माळ; जिल्हाधिकाऱ्यांना दिली खास भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जनआक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढलीय. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शेतकरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकू लागला आहे. नगर जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलनस्थळी दाखल होत आहे. या सगळ्यांच्या समवेत खासदार नीलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहेत.

Nilesh Lanke and Rani Lanke
Raju Shetti : दूध दराविषयी राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप

जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहेत. याच दरम्यान राणी लंके यांच्या पुढाकारातून काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या.

राणी लंके आणि महिलांसोबत पिठलं-भाकरी बनवली. राणी लंके म्हणाल्या, "शेतकऱ्यांच्या कांद्याला, दुधाला भाव मिळावा, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. शेतकरी टिकला, तर पैसा-पाणी वाढेल. बाजारभाव चांगला मिळेल. महागाई वाढत चालल्याने आंदोलनात शेतकऱ्यांबरोबर महिलांचा सक्रिय सहभाग आहे.

यातूनच महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटल्या आहेत". शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य व्हाव्यात, अन्यथा जेवणाची ही चूल आंदोलनस्थळी पेटती ठेवण्याची जबाबदारी आम्हा महिला सक्षमपणे पार पाडू. सरकार आणि प्रशासनाला हे परवडणार नाही, असा इशारा राणी लंके यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com