Nilesh Lanke : राणी लंके उमेदवारी करणार; खासदार लंके म्हणाले, "मी कार्यकर्ता..."

Nilesh Lanke presented his position on Rani Lanke candidacy in Parner : पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके उमेदवारी करतील, यावर खासदार नीलेश लंके यांनी भूमिका मांडली आहे. पारनेर विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
Nilesh Lanke and Rani Lanke
Nilesh Lanke and Rani Lankesarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कोण कोठून लढणार याची राजकीय गणितं आखली जात आहे, जुळवली जात आहे. प्रत्येक पक्षाने आमदारांची संख्या कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवायचं, हेच ध्येय ठेवले आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही रिस्क घ्यायची नाही, हे राजकीय पक्षांनी ठरवल्याचे दिसते. जिंकणारा उमेदवार, हा शेवटचा निकष राजकीय पक्षांनी ठेवला आहे.

यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. खासदार नीलेश लंके यांचा बालेकिल्ला असलेला पारनेर विधानसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खासदार लंके यांची पत्नी राणी लंके मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. खासदार लंके यांनी यावर काय निर्णय घेतला, आहे हे सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. आमचा पक्षाचा उमेदवार कोण असणार हे कार्यकर्ता म्हणून मला देखील सांगता येणार नाही. पक्षात वरिष्ठ नेते असतात. प्रत्येक मतदारसंघाबाबत पक्षातील नेते निर्णय घेतात. नेत्यांकडून जो उमेदवार दिला जाईल, त्या उमेदवारांच काम करणं ही कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे, असे सांगून पारनेरमधील उमेदवारीबाबत उत्सुकता कायम ठेवली.

Nilesh Lanke and Rani Lanke
Nilesh Lanke : 'खासदार लंके काय करतील, याचा नेम नाही'; कांद्याच्या माळा घालून संसद...

नीलेश लंके यांनी शरद पवार यांची साथ करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदारकी लढवली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लंके यांनी विजय मिळवला. भाजपचे (BJP) सुजय विखे यांचा लढतीत, पराभव झाला. पारनेरचे आमदार असलेले नीलेश लंके आता खासदार झाले. त्यामुळे त्यांच्या पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु खासदार लंके यावर खूप सावध भूमिका घेतली आहे. पक्ष श्रेष्ठीकडे बोट दाखवत, पारनेरच्या उमेदवाराचा निर्णयाचा चेंडू खासदार लंके यांनी पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात नेवून ठेवला आहे.

Nilesh Lanke and Rani Lanke
Ajit Pawar And Sandhya Sonawane : रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा युवा चेहरा; संध्या सोनवणे संधीचे सोनं करणार का?

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे नगर जिल्ह्याचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांमध्ये प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. यात पारनेर, श्रीगोंदे आणि नगर शहर मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यात पारनेरमधून राणी लंके विधानसभेच्या उमेदवार असतील, असे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहे. परंतु ऐनवेळी काय निर्णय होईल आणि यात खासदार नीलेश लंके यांची काय भूमिका असेल, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com