Nitin Thakare : लोकसभेला झिडकारलेल्या नितीन ठाकरेंना शिवसेनेची नवी ऑफर

Nitin Thakare News : नितीन ठाकरे यांना भाजप लोकसभेची उमेदवारी देईल, असा ठाम विश्वास होता. मात्र, त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.
Nitin Thakare
Nitin Thakare sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची लोकसभेची गाडी हुकली. शिवसेनेने त्यांना उमेदवारीसाठी नकार दिला होता.

भाजपवर विशेष प्रेम असलेल्या ॲड. नितीन ठाकरे यांना भाजप लोकसभेची उमेदवारी देईल, असा ठाम विश्वास होता. मात्र, त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. शेवटच्या क्षणी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी उंबरे झिजवले होते. उशीर झाल्याने शिवसेनेने त्यांचा मैत्रीचा हात झिडकारला होता.

आता शिवसेना नेते खासदार राऊत ( Sanjay Raut ) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. ठाकरे यांना शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. ॲड. ठाकरे लोकसभेची गाडी हुकल्याने विधानसभेच्या उमेदवारीची मनीषा बाळगून आहेत.

Nitin Thakare
Girish Mahajan : गिरीश महाजनांनी उन्मेष पाटलांवर डागली तोफ; म्हणाले, "मित्राला बळीचा बकरा केला अन्..."

महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी खासदार राऊत यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. हा मेळावा शिक्षक निवडणुकीच्या प्रचारापेक्षा ठाकरे यांना दिलेल्या ऑफरमुळे चर्चेत आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरात महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे. अनेक प्रबळ उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत. त्यांनी निवडणुकीची तयारी देखील जोरदारपणे सुरू केली आहे.

Nitin Thakare
Sanjay Raut : राज्यात नोव्हेंबरनंतर महाविकास आघाडीचे सरकार; संजय राऊतांचा 'कॉन्फिडन्स'!

या पार्श्वभूमीवर ठाकरे यांना दिलेल्या ऑफरने शहरातील राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. यामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ठाकरे काय निर्णय घेतात आणि ऑफर स्वीकारल्यावर त्यांना उमेदवारी मिळणार का? या दोन्हींबाबत उत्सुकता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com