Shobha Bachhav : खासदार शोभा बच्छाव यांनी पदर खोचला, धुळ्यात कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देणार

MP Shobha Bachhav Dhule : धुळ्यात काँग्रेस पक्षाला निवडणुकीत यश मिळवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार आहे.
Dr. Shobha Bachhav
Dr. Shobha BachhavSarkarnama
Published on
Updated on

Dhule Congress : धुळे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटन बळकटीकरणावर जोर दिला आहे. त्यासाठी धुळ्यात पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी खासदार शोभा बच्छाव यांचे प्रयत्न असून त्यासाठी निवडून येण्याची क्षमता आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे बच्छाव यांनी स्पष्ट केलं आहे.

कॉंग्रेस भवनात नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत खासदार शोभा बच्छाव यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने कानमंत्र दिले. यावेळी आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा झाली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर विजयी होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामन्य जनतेपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये निष्ठावान आणि मेहनती कार्यकत्यांना प्राधान्य देण्यात येईल असे जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांनी देखील सांगितले.

Dr. Shobha Bachhav
Eknath Khadse : सलग दुसऱ्या आठवड्यात खडसेंनी फडणवीसांचा दरवाजा ठोठावला, आता काय केली मागणी?

धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने विधानसभानिहाय निरीक्षक नियुक्त केले आहेत. या निरीक्षकांवर उमेदवारांची निवड, स्थानिक प्रश्नांचा अभ्यास आणि पक्षाची भूमिका निश्चित करणे अशा जबाबदाऱ्या आहेत. नियुक्त निरीक्षकांमध्ये साक्रीसाठी भरत टाकेकर, धुळे ग्रामीणसाठी राजाराम पानगव्हाणे, धुळे शहरासाठी जावेद फारुकी, शिंदखेडासाठी धनंजय चौधरी आणि शिरपूरसाठी रमेश कहानडोळे यांचा समावेश आहे.

Dr. Shobha Bachhav
Nashik Politics : उमेदवारी मागायला गेलेल्या भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांची फजिती, हकालपट्टी होता होता टळली..

यावेळी काँग्रेस भवनात जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील ब्लॉक अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यात शहराध्यक्ष साबीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, भानुदास गांगुर्डे, सुधीर जाधव, प्रमोद सिसोदे, गुलाब कोतेकर, बानूबाई शिरसाट, महिला अध्यक्षा गायत्री जयस्वाल व इतर वरिष्ठ पदाधिकारी यांची उपस्थितीती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com