MP Sujay Vikhe Patil News : जयंतरावच डाव टाकतील, खासदार विखेंनी उडवून दिली खळबळ !

MP Sujay Vikhe Commented on the Political Situation : टंचाई आढावा बैठकीपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य
Sujay Vikhe- Jayant Patil
Sujay Vikhe- Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेवटचा डाव तयार करून ठेवला आहे. दिल्ली सत्ताधारी त्यासमोर चितपट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता.

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी या दाव्याची खिल्ली उडवली आहे. 'जयंत पाटील हे तिकडे किती दिवस थांबणार हे अगोदर त्यांना विचारावे. तोच तो शेवटचा डाव आखतील', असा टोला खासदार विखे यांनी लगावला.

खासदार सुजय विखे गुरुवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई आढावा बैठकीसाठी आले आहेत. या बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील राष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. शरद पवार गटाकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.

दिल्लीतील सत्ताधारी यांना चितपट करण्यासाठी त्यांनी शेवटचा डाव राखून ठेवला आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले होते. यावर खासदार सुजय विखे म्हटले, जयंत पाटील हे तिकडे किती दिवस राहतील हे अगोदर पाहावे लागेल. नाहीतर शेवटचा ते डाव आखतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe- Jayant Patil
Shirdi News: थोरात, आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका; विखेंनी सुनावलं, काँग्रेसच्या विरोधात तुम्ही...

काँग्रेसच संपुष्टात आलीय, त्यांना विलीन व्हायचे त्यांनी व्हावे

शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, यावरदेखील चर्चा सुरू आहेत. यावर खासदार विखे म्हणाले, 'हा मोठा राजकीय विषय आहे. तो वरिष्ठ पातळीवर आणि त्यांचे ते पाहतील. वरिष्ठ पातळीवर चर्चेत मला घेऊ नका.

काँग्रेसमध्ये विलीन व्हायच्या चर्चेपूर्वीच काँग्रेस संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांनी त्या पक्षांमध्ये विलीन व्हावे का नाही, हा त्यांनी निर्णय घ्यावा. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. जे काही होईल ते आपल्याला कळेल. त्यावेळेस आपण पाहू.

आयुष्यभर ज्यांच्याविरुद्ध संघर्ष त्यांच्याच बरोबर हे बसले

भाजपला दहा बाप आहेत,अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर सुजय विखे यांनी म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदुहृदयसम्राट आहेत. ते आमच्यासाठी वंदनीय आहेत आणि ते एकमेव हिंदुहृदयसम्राट आहेत.

भाजपमधील एकही नेता, एकही कार्यकर्ता त्यांना वंदन केल्याशिवाय राहू शकत नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे कोणत्या एका पक्षाचे नसून ते सर्वांचेच आहेत. त्यांच्यावर कोणी एक हक्क सांगू शकत नाही'. बाळासाहेबांनी ज्यांच्याविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. तेच आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.

Edited By : Chaitanya Machale

R

Sujay Vikhe- Jayant Patil
Loksabha Election 2024 : मुंबईतून निवडणूक लढणार ही जलील यांनी सोडलेली पुडीच; असा निर्णय न झाल्याची ओवेसींची माहिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com