MP Supriya Sule News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, खासदार सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान

Ncp Meeting Shirdi: दिल्लीने डोळे वटारले की 'हे' गप्प बसतात...
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Ahmednagar News : शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अधिवेशनातून खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील भाजपवर निशाणा साधला. राज्यातील राजकारणी दिल्लीने डोळे वटारले, तर हे गप्प बसतात. ही अदृश्य शक्ती आहे. मी मात्र तिला घाबरत नाही. माझी लढाई महाराष्ट्रातील कोणाशी नसून या अदृश्य शक्तीविरुद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, सरकार येताच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आणि एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन हा पहिला निर्णय होईल, असेही त्या म्हणाल्या.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच मुख्यमंत्र्यांची पहिली सही अंगणवाडी सेविकांसाठी असेल, असे जाहीर करीत खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेणार आहोत, असे सांगितले. राज्यात महिला सुरक्षिततेचे धोरण, प्रत्येक तालुक्यात महिलेला बचत गटासाठी स्वमालकीचे दुकाने, एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन, सरकारी नोकरीतील कंत्राटी पद्धतीच्या निर्णयाचा फेरविचार, एक जूनला राज्यात कोठेही शाळाबाह्य मुले राहणार नाहीत, यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा सज्ज ठेवणार. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान हा तीनकलमी कार्यक्रम राज्यात राष्ट्रवादीतर्फे राबवला जाणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule
Ramdas Athawale : अजितदादा युतीत आले अन् त्यांचाच विस्तार झाला..! रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत...

पुण्यातील मेट्रोसाठी या सरकारने 18 हजार कोटी रुपये खर्च केला आहे. परंतु राज्यातील एसटी महामंडळाची दुर्दशा झालेली आहे. एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केवळ एक हजार कोटी लागतात. मेट्रोला 18 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा आपले सरकार आल्यावर एक हजार कोटी खर्च करून एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन झाले म्हणजे, अजितदादाला राज्यात फाटकी एसटी दिसणार नाही, असा चिमटादेखील खासदार सुळे यांनी काढला.

लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे. मी विधानसभा लढवणार नाही. माझी लढाई दिल्लीतील अदृश्य शक्तीविरुद्ध आहे. दिल्लीतील या शक्तीने डोळे जरी वटारले, तरी राज्यातील सध्याचे राज्यकर्ते गप्प बसतात. खोटे बोलतात. छत्रपती शिवाजीमहाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे म्हणतात. पण देत नाहीत. लोकप्रतिनिधी व्हायचे की ठेकेदार व्हायचे हे आपण ठरवण्याची वेळ आली आहे, असेही खासदार सुळे यांनी म्हटले.

Edited By : Chaitanya Machale

Supriya Sule
MLA Sunil Kamble News : भाजप आमदारांना सत्तेचा माज, गृहमंत्री फडणवीस गप्प का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com