MLA Sunil Kamble News : भाजप आमदारांना सत्तेचा माज, गृहमंत्री फडणवीस गप्प का?

Sushma Andhare, Vijay Wadettiwar: सुषमा अंधारे, विजय वडेट्टीवार कडाडले
Sunil Kamble, Vijay Wadettiwar, Sushma Andhare
Sunil Kamble, Vijay Wadettiwar, Sushma AndhareSarkarnama

Pune News : भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. कांबळे हे कायमच अर्वाच्य आणि शिवराळ भाषा, मारहाण, दादागिरी करण्यासाठी कूप्रसिद्ध आहेत, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कांबळे यांनी केलेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया दिली. खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारामध्ये कशी आली, असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत राज्याचे गृहमंत्री गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ससून रुग्णालयामध्ये एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी आलेले भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे पदाधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी देखील आमदार कांबळे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर शुक्रवारी थेट पदाधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याने कांबळे यांच्या विरोधात सर्वच स्तरातून आवाज उठविला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Kamble, Vijay Wadettiwar, Sushma Andhare
Ajit Pawar News : भाजप आमदार सुनील कांबळेंनी अजितदादांच्या कार्यकर्त्याच्या कानाखाली आवाज काढला

'आमदार कांबळे यांनी दाखविला सत्तेचा माज, भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो', अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजप आमदार सुनील 'कांबळे हे कायमच अर्वाच्य आणि शिवराळ भाषा, मारहाण, दादागिरी करण्यासाठी कूप्रसिद्ध आहेत', अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी कांबळे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपचा आमदार असल्याने त्यांची वारंवार हिंमत वाढत आहे. 'पक्षाकडून त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांचे जणू आमदार खासदारांना परमिट मिळाले आहे', असेही अंधारे म्हणाल्या.

Sunil Kamble, Vijay Wadettiwar, Sushma Andhare
Pune News : कोथरुडमध्ये थरार; गुंड शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com