Supriya Sule News : " दादा, तू मुख्यमंत्री हो; पण गृहमंत्रिपद 'त्यांना' देऊ नकोस..."; खासदार सुळेंचा अजितदादांना मोठा सल्ला

NCP Political News : " अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल..."
Supriya Sule - Ajit Pawar
Supriya Sule - Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये डेरेदाखल झाल्यापासून अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह खुद्द अजित पवारांनीच मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरून फटकारल्यानंतर मध्यंतरी काही दिवस या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

मात्र, आता मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीच एकदा नव्हे दोनदा अजित पवारांच्या(Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदावर भाष्य केल्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

Supriya Sule - Ajit Pawar
Gadchiroli Nitish Kumar News : महाराष्ट्र सरकारला लाजवतोय गडचिरोलीतील नितीश कुमारांच्या अभिनंदनाचा फलक !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) या नगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, अजितदादाला माझी एवढीच विनंती राहील की, तू जेव्हा मुख्यमंत्री होशील, तेव्हा गृहमंत्रिपद दुसरे कोणालाही दे. मात्र, फडणवीसांना ते देऊ नको. कारण तरच राज्यातील आमचे हेरंब कुलकर्णींसारखे भाऊ सुरक्षित राहतील, असा टोलाही सुळेंनी लगावला.

खासदार सुळे म्हणाल्या, अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल. मात्र, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना माझी एक अट असेल, अजितदादांना पहिला हार मला घालू द्यावा,’’ अशी इच्छा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. याचवेळी त्यांनी फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत, मोठा भाऊ कसा असावा तर तो देवेंद्रजींसारखा असावा. १०५ आमदार असतानाही दुसऱ्याला मुख्यमंत्रिपद द्यायची त्यांची तयारी आहे, अशी बोचरी टीकाही सुळे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हावरील दावे-प्रतिदाव्यांवर आता केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. यावर सुळे म्हणाल्या, मला न्यायालयावर आणि निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे.

मात्र, तो पेपर फुटला आहे का ? काही गोलमाल आहे का? दिल्लीची अदृश्य शक्ती ही काहीतरी गडबड करेल, अशी शंका वाटते. पण घड्याळ हे चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली हे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांनाच माहिती असल्याचेही सुळे म्हणाल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Supriya Sule - Ajit Pawar
Dasara Melava News : शिवसैनिकांनी एकमेकांना दगड मारणे अपेक्षित नाही; शिरसाटांचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com