Nagar News : पदभार घेतला अन् पहिल्याच दिवशी जातीय तणावाला सामोरे गेले!

Rahuri Police Station : वादाची ठिणगी पडली...
Satara Police Transfer:
Satara Police Transfer: Sarkarnama
Published on
Updated on

Nagar : देशात उत्सवाचे वातावरण असतानाच नगर जिल्ह्यामध्ये मात्र जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांनी प्रयत्न केला. राहुरीतील वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या वेशीचा रंग काही समाजकंटकांनी बदलला आहे. यातून वादाची ठिणगी पडली होती. राहुरी पोलिसांनी दोन्ही समाजघटकांना शांततेचे आवाहन केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राहुरी पोलिस ठाण्यात संजय ठेंगे हे निरीक्षकपदी हजर झाले आहेत. यातच वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ परिसरातील जातीय तणावाला हजर होण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना सामोरे जावे लागले.

राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ येथे जातीय वादाची ठिणगी पडल्याने दोन्ही गावांत तणाव निर्माण झाला. दोन्ही गावाच्या सीमा रस्त्यावर धार्मिक स्थळ आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर एक कमान आहे. काही समाजकंटकांनी रात्रीच्यादरम्यान त्या कमानीला पूर्वी असलेला रंग बदलून दुसरा रंग दिला. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्याने दोन्ही गावचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे दोन्ही गावांत तणाव निर्माण झाला. जमा झालेल्या दोन्ही गावांतील काही ग्रामस्थांनी शांततेची भूमिका घेतली.

दोन्ही स्थानिक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत याबाबतचा निर्णय घ्यावा. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शांतता ठेवावी, असे सर्वानुमते ठरले. श्रीरामपूर येथील उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक पोपट कटारे गावात फौजफाट्यासह दाखल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गावांच्या ग्रामस्थांशी चर्चा करीत शांततेचे आवाहन केले. दोन्ही गावांत शांतता असून घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांनी शांतता ठेवून पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

R...

Satara Police Transfer:
Kolhapur Politics : मतदारांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचा हात; भाजपला जशास तसे उत्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com