नाशिक : पिंपळगाव नजिकच्या (Niphad) शेती बिनशेती करण्याच्या प्रकरणात ३५ हजारांची लाच स्वीकारताना निफाडच्या नायब तहसीलदार व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज अटक केली. कल्पना शशिकांत निकुंभ (५७) (Kalpna Nikumbh) व कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे (३८) (Amol Katare) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. दरम्यान, नायब तहसीलदार निकुंभ यांना सेवानिवृत्तीसाठी अवघे पाच महिने राहिले होते. (Lady revenue officer arrested by ACB in Niphad)
तक्रारदारांने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे चुलत आजोबा व इतरांचे मौजे पिंपळगाव नजिक गटापैकी ८३०० चौ.मी. क्षेत्र बिनशेती करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी निफाड तहसिलमध्ये विनंती अर्ज दिला होता. याप्रकरणात कार्यालयीन टिप्पणीवर सही करून ते तहसीलदारांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांना रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, विभागाने सापळा रचला असता नायब तहसीलदार निकुंभ यांच्या सांगण्यावरून संशयित कोतवाल अमोल कटारे याने प्रशासकीय इमारतीच्या पुरुष प्रसाधनगृहात लाचेची ३५ हजारांची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल बागूल, गायत्री जाधव, अजय गरुड, किरण अहिरराव, संतोष गांगुर्डे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.