Congress News: नाना पटोले `पदवीधर`साठी काय कानमंत्र देणार?

Nana Patole: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराचे वारे जोमात आहेत. यासंदर्भात आजपर्यंत उमेदवारीबाबत गोंधळलेल्या काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध बैठका होतील. या दौऱ्यात ते महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काय कानमंत्र देणार याची उत्सुकता आहे. (Will congres state president Nana Patole clear party position)

Nana Patole
Supriya Sule News: काँग्रेस प्रणित सरकार सत्तेत आल्यावर गडकरींचं मंत्री पद कायम ठेवणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस भवनमध्ये झेंडा वंदन होऊन हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ होणार आहे.

Nana Patole
Politics : ''...त्यांचं तैलचित्र लावताना कशाचं डोंबलाचं राजकारण करता!''; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरेंना सुनावलं

यावेळी जिल्ह्याचे सहप्रभारी ब्रिज किशोर दत्त उपस्थिती राहणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता हॉटेल एस. एस. के (तिडके कॉलनी)येथे प्रदेशाध्यक्ष पटोले, सह-प्रभारी ब्रिज किशोर दत्त, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीधर विधानपरिषद उमेदवाराच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरु आहे. याबाबत सुरवातीपासून उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याबाबत प्रदेशाध्यक्षांना त्यावर नेमका तोडगा सापडला नाही. त्यामुशे सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहे. या वादात हा मतदारसंघ शिवसेनेने मिळवला. त्यांनी शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर करीत प्रचार देखी सुरु केला. त्यात काँग्रेसच भूमिका नेमकी काय हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससाठी शुभांगी पाटील यांच्याविषयी मतदारांत प्रचाराचे धोरण व यंत्रणा कशी उभारणार, याबाबत श्री. पटोले यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे. ते या दौऱ्यात काय कानमंत्र देतात याकडे लक्ष आहे.

अभियान शुभारंभ तसेच बैठकीस पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी विभाग, असंघटित कामगार काँग्रेस, सोशल मीडिया विभाग, विज्ञान विभाग व सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ओबीसी विभाग विजय राऊत, प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, वाय. के. खैरनार, मयूर वांद्रे, गौरव वाघ (सोनार), अरुण नंदन, प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आदींनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com