Jalgaon News : नांदेड येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, "नांदेड येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. उपचाराअभावी रुग्ण दगावने ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अगोदरच राज्यात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सरकार त्याबाबत गंभीर नाही. त्यात आता नांदेड येथे बालकांवर उपचार करण्याचा हलगर्जीपणा करणे हा अंत्यत वाईट आहे,"
"राज्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा शासनाकडून न होणे ही सुध्दा अत्यंत गंभीर बाब आहे. याला माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ जबाबदार आहेत. महाजन यानी पालकमंत्री म्हणून किती वेळा या रुग्णालयाला भेट दिली,गेली पाच वर्षे तेच वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यावेळी त्यांनी काय केले, असा प्रश्नही निर्माण होत आहे. नैतिकता ठेवून दोघांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा," अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पुन्हा चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला. मागील ३६ तासांत मृत रुग्णांची संख्या ३१ पर्यंत पोहोचली आहे.
नांदेड येथील मृतांच्या चौकशीसाठी मंगळवारी आरोग्य विभागाची समिती रुग्णालयात दाखल झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मुंबईतून चौकशीचे आदेश दिले व दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. नांदेडच्या रुग्णालयात सध्या १३८ नवजात बालकांवर उपचार सुरू आहेत. त्यात ३८ नवजातबालकांची प्रकृती अत्यवस्थ आहे. इतर २५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचीमाहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यातआली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.