Suhas Kande Politics: नांदगावला आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना मागे टाकले, पहिल्याच फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला मोठी आघाडी!

Nandgaon Council Election Shivsena MLA Suhas Kande Candidate Sagar Hire Leading, Sameer Bhujbal Candidate on backfoot-शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सागर हिरे यांनी घेतली सोळाशे मतांचे आघाडी, राजेश बनकर पिछाडीवर
Suhas-kande-Chhagan-Bhujbal
Suhas-kande-Chhagan-BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nandgaon News: नांदगाव नगरपालिका निवडणुकीत आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात चुरस आहे. विधानसभा निवडणुकीतील राजकीय वादाचे पडसाद या निवडणुकीत दिसून आले.

नांदगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली आहे. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांनी सहकारी पक्षांना बरोबर घेत पॅनल उभे केले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी मोर्चे बांधणी केली आहे.

नगराध्यक्ष पदाचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार सागर हिरे यांनी पहिल्याच फेरीत ३४३६ मते मिळवली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेश बनकर यांना एक हजार ८१७ मते मिळाली. आमदार कांदे यांचे उमेदवार हिरे यांनी पहिल्याच फेरीत सोळाशे मतांची आघाडी घेतली आहे.

या निवडणुकीत आमदार कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पॅनल उभे केले आहे. या दोन्ही परागत राजकीय विरोधकांमध्ये नगरपालिका निवडणुकीत चुरस आहे. त्यात दोन्ही नेत्यांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पहिल्याच फेरीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवाराला अपेक्षीत आघाडी मिळाली. त्यामुळे आमदार कांदे समर्थकांनी जल्लोष केला. या निवडणुकीत आमदार कांदे यांनी सत्तेच्या माध्यमातून विरोधकांचे विविध नेते फोडले होते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com