Vote jihad controversy : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'वोट जिहाद', 'AIMIM'चा विजय, हिरव्या रंगाची उधळण; भाजपच्या हिना गावित बरंच बोलल्या...

Nandurbar Municipal Election: Eknath Shinde Sena Victory, Heena Gavit Concern : नंदुरबार नगरपालिका निवडणुकी एकनाथ शिंदे शिवसेने मिळवलेल्या विजय वोट जिहादचा भाग असल्याची प्रतिक्रिया भाजप हिना गावित यांनी दिली.
Heena Gavit Concern
Heena Gavit ConcernSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Municipal Election : नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत, एकनाथ शिंदे शिवसेनेने नगराध्यक्षपदासह नगरपालिकेवर विजय मिळवत कब्जा केला. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे हे यश, भाजपला काही रूचलेलं दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या विजयामागे 'वोट जिहाद' आहे, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

तसंच नगरपालिकेत 'AIMIM'च्या चार नगरसेवकांच्या विजयानंतर रस्त्यावर उधळलेल्या हिरव्या रंगावर देखील भाजपने नंदुरबारकरांसाठी 'अलर्ट' आहे. भाजपच्या माजी खासदार डाॅ. हिना गावित म्हणाल्या, "नगराध्यक्ष पदावर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा विजय हा 'वोट जिहाद'चा भाग असून, 'AIMIM'च्या नगरसेवकांचा विजय नंदुरबारकरांसाठी चिंतेची बाब आहे."

भाजपच्या माजी खासदार डाॅ. हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, "नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा विजय रोखण्यासाठी 'वोट जिहाद'चा वापर झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपला रोखण्यासाठी 'AIMIM'सारख्या कट्टरपंथी पक्षासोबत छुपी हातमिळवणी केली."

डॉ. हिना गावित यांच्या मते, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांना मिळालेल्या 41 हजार 641 मतांपैकी सुमारे 18 हजार मते केवळ मुस्लिम समाजाची आहेत. याउलट, भाजपचे (BJP) उमेदवार अविनाश माळी यांना 54 हजार हिंदू मतांपैकी 30 हजार 531 मते मिळाली आहेत. हा विजय हिंदुत्वाचा नसून केवळ मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा आहे, असे म्हटले.

Heena Gavit Concern
Navi Mumbai Municipal Corporation : माजी नगरसेवकांचा कहर, स्वतःसह पत्नी, मुलगा, सून, छोट्या मुलासाठी तिकिटांची मागणी! एकनाथ शिंदेंना होतय ब्लॅकमेलिंग?

''AIMIM'च्या उमेदवारांचा विजय आणि त्यांना 10 हजारांच्या आसपास मत मिळाली आहे. तेवढ्याच मतांनी शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी विजयी झाल्या आहेत. एका विशिष्ट समुदायाने वोट जिहाद केला. भाजपचा उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी 'AIMIM'चा उमेदवार असून, त्यांना मतदान न करताना, रत्ना रघुवंशी यांना मतदान केला,' असा घणाघात डाॅ. हिना गावित यांनी केला.

Heena Gavit Concern
New Rules 1 January 2026 : नवीन वर्षात बँकिंग ते LPG पर्यंत मोठे बदल; काय महागणार अन् काय होणार स्वस्त?

'हे सर्व भाजपचा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी केलं गेलं. हिंदुत्वाला रोखण्यासाठी वोट जिहाद केला आणि रत्ना रघुवंशी यांना मतदान केलं. रत्ना रघुवंशी यांचा हा विजय नसून, वोट जिहादचा विजय आहे,' असा गंभीर आरोप हिना गावित यांनी केला.

शहरात पहिल्यांदाच हिरवा रंग उधळला जाणे ही नंदुरबारकरांसाठी धोक्याची घंटा आहे, असे हिना गावित यांनी म्हटले. भाजपतर्फे आनंदा माळी यांची गटनेतेपदी, तर हिरालाल चौधरी यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड जाहीर करण्यात आली. पराभवानंतरही हिंदू मतदार भाजपच्या पाठिशी संघटित होत असल्याचे चित्र या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे, असा विश्वास डॉ. गावित यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com