Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढणार; कोण जिंकणार ?

Maharashtra Politics Nagpur Voter List: नागपूरमध्ये ७५ टक्के मतदानाचे उद्धष्ट्य ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ५४ टक्के मतदान झाले. याचा फटका कोणाला बसला हे निश्चित सांगता येत नसले तरी निकाल बदलला असता, असा दावा काँग्रेस आणि भाजपतर्फे केला जात आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Electionsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: लोकसभा निवडणुकीत झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेत आहेत. बीएलओच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

ग्रामीण भागात सुमारे ९० ते शहरामध्ये ६५ टक्के घरांमध्ये आतापर्यंत भेटी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढणार आहे. याचा फायदा कोणाला होईल, हे निकालानंतरच समोर येणार आहे.

लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी मोठा घोळ समोर आला होता. मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाली होती. काहींच्या नावांसमोर डिलिट अशा शिक्का मारण्यात आला होता. त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते.

नागपूरमध्ये ७५ टक्के मतदानाचे उद्धष्ट्य ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ५४ टक्के मतदान झाले. याचा फटका कोणाला बसला हे निश्चित सांगता येत नसले तरी निकाल बदलला असता, असा दावा काँग्रेस आणि भाजपतर्फे केला जात आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी एक लाख ३५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. विकास ठाकरे यांनी आपण एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ असा दावा केला होता. मतदार याद्यांमधून सुमारे पावणे दोन लाख मतदारांनी नावे गहाळ असल्याचे समोर आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर निवडणूक विभागावर मोठे आरोप झाले होते. झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय नोंदणी व पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. २५ जुलैपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. या अंतर्गत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेण्याचे काम करीत आहेत.

Vidhan Sabha Election
Sanjay Raut On Amit Shah: अमित शाह गृहमंत्री आहेत, हे सांगायला लाज वाटते!

लोकसभा निवडणुकीतही बीएलओंना घरोघरी जाऊन माहिती घ्यायची होती. त्यांनी कागदोपत्री सोपस्कार पाडल्याचा आरोप आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यात प्रशासनाला अपयश आले होते.

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाचा आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा बीएलओंना घरोघरी जाऊन यादी अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात म्हणजे रामटेक लोकसभा मतदार संघातील क्षेत्रात ९० टक्क्यांच्यावर घरी बीएलओंनी भेटी दिल्या आहेत.

नागपूर लोकसभा क्षेत्राच्या हद्दीत ६५ टक्केच घरी बीएलओ गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिवंत व्यक्तींची नावेही डिलीट करण्यात आली होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मागील निवडणुकीचा अनुभव पाहता यावेळी नावे डिलीट करण्यावर भर कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com