Mahayuti: महायुतीत जागा वाटपावरून पेच; शिवसेनेच्या 'या' दोन जागांवर राष्ट्रवादीनं ठोकला दावा

Ajit Pawar Group vs Shinde Group Controversy over Seat Allocation In Nandurbar नवापूरमध्ये उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. अक्कलकुवा मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सक्षम पर्याय असल्याने या दोघी जागा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी आग्रही आहे.
Nandurbar Politics
Nandurbar PoliticsSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. शिंदे गटाने दावा केलेल्या अक्कलकुवा आणि नवापूर या दोन मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सक्षम उमेदवार असल्याने हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केले आहे. शिंदे गटाने अगोदरच दावा केलेल्या या मतदारसंघांवर आता राष्ट्रवादीने ही दावा केल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीत समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Nandurbar Politics
Vanraj Andekar: बापच टोळीचा म्होरक्या, आई माजी नगरसेविका, अशी आहे आंदेकर टोळीची दहशत

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष या दोघी जागा लढवणार असल्यावर ठाम आहे. "आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याने आम्ही या जागा सोडणार नाहीत," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले.

मागील निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विचाराच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सक्षम पर्याय आपल्याकडे असल्याने या दोघी जागा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी आग्रही असल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04 (Nandurbar MLA List)

  1. अक्कलकुवा विधानसभा - के. सी पाडवी (काँग्रेस)

  2. शहादा विधानसभा- राजेश पाडवी (भाजप)

  3. नंदुरबार विधानसभा - विजयकुमार गावित (भाजप)

  4. नवापूर विधानसभा - शिरीष नाईक (काँग्रेस)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com