Narhari Zirwal and Ajit Pawar : 'खासदार व्हा म्हणत होते, पण मला मराठीच येतं'; नरहरी झिरवाळांची अजितदादांसमोर तुफान फटकेबाजी

Narhari Zirwal stormy speech in front of Ajit Pawar : नाशिकच्या दिंडोरीत जनसन्मान रॅली घेऊन दौऱ्यावर आलेले अजित पवार यांच्यासमोर नरहरी झिरवाळ यांनी भाषणातून तुफान टोलेबाजी केली.
Narhari Zirwal and Ajit Pawar
Narhari Zirwal and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार जन सन्मान रॅली घेऊन नाशिक जिल्ह्यात आहेत. गुलाबी कोट, गुलाबी रंगाने अच्छादलेली वाहनातून त्यांची रॅली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे त्यांची ही रॅली चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नाशिकच्या दिंडोरीतील आमदार नरहरी झिरवाळ यांच्या बालेकिल्ल्यात दिंडोरीत ही रॅली पोचली आहे.

अजित पवार यांच्यासमोर झिरवाळ यांनी यावेळी भाषणातून तुफान फटकेबाजी केली असून ती चर्चेत आहे. "पक्ष खासदार व्हायला सांगत होते. पण मला मराठीच येते, तर मग मी कशाला खासदार होऊ, असे म्हणत आपण आमदारकीसाठी सगळी फिल्डिंग लावली आहे", असे संकेत झिरवाळ यांनी पवारांना दिले.

नरहरी झिरवाळ यांनी यावेळी तुफान भाषण केले. त्यामुळे अजित पवार यांच्या नाशिक (Nashik) दौरा चर्चेत आला. नरहरी झिरवाळ यांनी भाषणाचा चढवलेला टोन सर्वांना भावला. अजितदादा देखील त्यांच्या भाषणावर स्मित करत होते. कान देऊन ऐकत होते. नरहरी झिरवाळ यांनी अजितदादांना वेगळ्या खुर्चीवर बसल्याचं पाहायचं आहे, असे म्हणताच, अजितदादांचे कान अधिक दक्ष झाले आणि मान देखील त्यांनी झिरवाळ यांच्याकडे वळवली. अजितदादांना वेगळ्या खुर्चीवर बसल्याचे पाहायचं आहे, त्यासाठी सगळ्यांनी मदत करायची आहे, असे आवाहन नरहरी झिरवाळ यांनी केले.

Narhari Zirwal and Ajit Pawar
Gokul Zirwal: दादांच्या 'जनसन्मान' कडे पाठ; गोकुळ झिरवाळ साहेबांकडेच!

नरहरी झिरवाळ यांनी भाषणाच्या सुरवातीलाच लाडक्या बहिणी आणि लाडके दाजी यांचे स्वागत करतो, असे म्हणताच हशा पिकला. "मी विधानसभेचा अध्यक्ष आहे. पण आता माझं इथं कोणी ऐकत? त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विनंती करतो की, मला जास्त बोलण्याची संधी द्यावी. मला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर केवळ अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळे बसायला मिळाले. अनेक जण म्हणायचे की, वरिष्ठ पदावर मी बसतो, मात्र हातात काहीचं मिळतं नाही. मी भाषण केले, त्याच्या दुसऱ्या दिवशी कोरोना आला. दररोज खुर्चीवर औषध फवारं लागत होतं. निम्मा विकास निधी इथंच खर्च व्हायचा", असे झिरवाळ यांनी म्हणताच सभास्थळी हशा पिकला.

Narhari Zirwal and Ajit Pawar
Gulabrao Patil On Sharad Pawar: शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं लोकसभेला भाजपला मदत केली; गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा

आदिवासी दिनानिमित्त सुटी

"ज्यातील 13 आदिवासी जिल्ह्यात उद्या आदिवासी दिनानिमित्ताने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मला पक्ष खासदारकी देत होता, असे सांगून आता मला मराठीतच येते, तर मग मी कशाला खासदार होऊ", असा झिरवाळ यांनी शेरा मारताच व्यासपीठावरील नेत्यांसह सभास्थळी एकच हस्यकल्लोळ झाला.

झिरवाळ यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब

अजित पवार यांनी नाशिकमधील दिंडोरीमध्ये विकास कामाला निधी दिल्याची आकडेवारी सांगितली. दिंडोरीमध्ये 804 कोटी रुपये निधी दिल्याचे सांगून नरहरी झिरवाळ काय मला गप्प बसून देत नाही. अजून निधी पाहिजे, अजून निधी पाहिजे म्हणून मागे लागलेत. यावर 1500 कोटी रुपये दिले. मार्केट कमिटी, नगरपालिका यासाठी निधी दिला. नरहरी झिरवाळ यांच्या कामाची पद्धतच वेगळी असल्याचे अजित पवार यांनी सांगत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com