Gulabrao Patil On Sharad Pawar: शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं लोकसभेला भाजपला मदत केली; गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा

Jalgaon Shivsena Vs BJP Political News : मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील जळगाव आणि रावेर मतदारसंघाच्या निकालावर मोठं भाष्य केले आहे.
 Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या टिका- टिप्पणी, गौप्यस्फोट, हेवे-दावे यांनी राजकीय वातावरण तापू लागलं आहे.आपल्या तडाखेबंद भाषणासाठी ओळखले जाणारे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील जळगाव आणि रावेर मतदारसंघाच्या निकालावर मोठं भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा खळबळजनक दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतली होती.जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मदत करण्यासाठी सुद्धा गुलाबराव देवकर यांनी मंगेश चव्हाण यांचा चहा पिला. देवकर यांना चव्हाण यांच्या जिल्हा दूध संघाचा चहा खूप आवडत असल्याची मिश्किल टिप्पणीही मंत्री पाटील यांनी केली आहे. जळगावात निवडणुकीवेळी देवकर दिसले नाहीत. ते फक्त रावेर मतदारसंघातच फिरले असल्याचा विधानही गुलाबराव पाटील यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशातच आमदार चव्हाण यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 Minister Gulabrao Patil
Latur BJP Politics : धीरज देशमुखांच्या विरोधात उमेदवार अन् कव्हेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट..

गुलाबराव पाटील यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही फटकारले आहे. ते म्हणाले,लोकसभा निवडणुकीत परमेश्वराच्या साक्षीने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो की,मी निष्ठेने भाजपसाठी काम केले आहे

शिवसेनेनं भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनी कसे वागावे?हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितले.

 Minister Gulabrao Patil
Rajya Sabha by Election : राज्यसभा निवडणुकीत एनडीए की इंडिया, कुणाचं पारडं जड? असं आहे विजयाचं गणित...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com