Narahari Zirwal : मंत्री झिरवाळ कथित 'व्हिडीओ' प्रकरणात मोठा ट्विस्ट, FIR रद्द करण्यासाठी संशयित आरोपीची कोर्टात धाव..

Narahari Zirwal Video Case : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. संशयित आरोपीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama
Published on
Updated on

Narahari Zirwal Video Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेल्याचं वाटत असतानाच या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

या प्रकरणात संशयित आरोपी अर्थात ज्या व्यक्तीवर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप आहे, त्याने आता थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेला एफआयआर (FIR) बेकायदेशीर असून रद्द करण्याची मागणी या व्यक्तीने याचिकेद्वारे केली आहे.

व्हायरल व्हिडिओ मध्ये मंत्री नरहरी झिरवाळ एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार त्याच तृतीयपंथीय व्यक्तीने दाखल केली होती, जिचा संबध या व्हिडीओशी जोडला गेला होता.

Narhari Zirwal
Narahari Zirwal : आरोप झाला की घे राजीनामा... 3 वेळा केलं ; मग झिरवाळांना सूट का?

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा दुसरा कोणी नसून तिचा स्वतःचा भाऊ आहे, असे तृतीयपंथीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार करताना सांगितलं होतं. संशयित आरोपीने मूळ व्हिडिओशी छेडछाड करून तो लीक केल्याची तक्रार करण्यात आली होती. व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला धमकावण्याचा व मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Narhari Zirwal
Narhari Zirwal Resign : नरहरी झिरवळांना अभय, राजीनामा घेणार नाही! राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय

ज्याच्यावर हा व्हिडीओ लीक केल्याचा आरोप झाला त्या संशियत आरोपीने आता हायकोर्टात याचिका दाखल करून स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. याचिकेत संशयित आरोपीने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्याला जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचा दावा त्याने केला आहे. याउलट संबधित तृतीयपंथीय व्यक्ती ब्लॅकमेलिंग, धमकी आणि पूर्व नियोजित कट रचणे अशा कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच कफ परेड पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर कायदेशीररित्या चुकीची असल्याचे सांगत ती रद्द करुन आपल्याला न्याय देण्यात यावा अशी विनंती त्याने न्यायालयाला केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com