Narahari Zirwal : मंत्री झिरवाळांची विकेट पडता पडता वाचली, राजीनामा न घेण्याचं कारण काय?

Narahari Zirwal viral video Controversy : राज्यभरात खरात प्रकरण गाजत असतानाच राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांच्यासोबत एक तृतीयपंथी असल्याचा दावा करण्यात आला.
Narhali Zirwal
Narhali ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमुळे झिरवाळ यांच्यावर कारवाई होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. मात्र पक्षाने त्यांना अभय दिले असून त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुळात अशोक खरात याच्या कारनाम्यांची गाथाच इतकी मोठी होती की, त्या तुलनेत झिरवाळांच्या कथित व्हायरल व्हिडीओचा प्रभाव तितका उमटला नाही. अशोक खरातच्या कारनाम्यांच्या आड तो दडपला गेला. त्यामुळे त्याची माध्यमांमध्ये असो की जनमानसात खरात प्रकरणाच्या तुलनेत तितकी चर्चा झाली नाही. तेही झिरवाळांच्या पथ्यावर पडल्याचे दिसते.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने राष्ट्रवादीचे मंत्री वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत सापडले. यापूर्वी धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांची विकेट पडली, दोघांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर, खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यात आता चौथी विकेट मंत्री झिरवाळांची पडते की काय याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते.

Narhali Zirwal
Ashok Kharat : भोंदू खरातसोबत भाजप मंत्र्याचा तो फोटो निघाला बनावट ; धुळ्यात गुन्हा दाखल..

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी बदनामी झाली. कारण, शेकडो महिलांचे लैगिंक शोषण करणाऱ्या खरातचे पाय धुताना तसेच त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाचे चाकणकर यांचे फोटो व व्हिडीओ समोर आले. रुपाली चाकणकर या स्वत: महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचीच अशाप्रकारे महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूसोबतची जवळीक व त्याला गुरु मानणे हे व्यवस्थेलाच न पटणारे होते. शेकडो महिलांचे लैगिंक शोषण, अंधश्रद्धा, फसवणूक अशी या प्रकरणाची व्याप्ती मोठी होती. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं पक्षाला भागच पडलं.

Narhali Zirwal
Ashok Kharat News: खरातनं अनेकांना कसं गंडवलं? कशी होती त्याची मोडस ऑपरेंडी? फेस, हॉट, कोल्ड' रीडिंगचा वापर

याआधीचे धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे यांचे प्रकरणही थेट व्यवस्थेशी संबधित होते. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात जवळचा सहकारी वाल्मिक कराड याचे नाव आल्याने आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा पक्षाला घेणे भाग पडले. तसेच जवळपास अडीच महिन्यांहुन अधिक काळ माध्यमांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. या हत्येमुळे दोन जातींमध्ये मोठी तेड निर्माण झाली होती. अशात संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय होऊ द्यायचा असेल तर सरकारमध्ये मंत्री असलेल्या मुंडे यांचा राजीनामा झाला पाहीजे अशी मागणी जोर धरु लागली होती.

Narhali Zirwal
Narhari Zirwal video : ‘तो’ व्हिडीओ समोर येताच झिरवाळांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; फडणवीसांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा...

तसेच माणिकराव कोकाटे हे कृषीमंत्री असताना त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांविषयी केलेले वादग्रस्त विधानं. विधान परिषदेत अधिवेशन सुरु असताना व्हायरल झालेला कथित रमी खेळतानाचा व्हिडीओ. यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढला होता. कारण हा विषय थेट राज्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित होता. त्यामुळे त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेत त्यांना क्रीडाखाते देण्यात आले होते. मात्र, सदनिका घोटाळाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकोटेंची किती पाठराखण करायची असा प्रश्न पक्षालाही पडला होता. परिणामी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा लागला.

लागोपाठ वेगवेगळ्या कारणांनी राष्ट्रवादीच्या अशा तीन मोठ्या नेत्यांच्या विकेट पडल्या. त्यामुळे पक्षाची बदनामी झाली. त्यामुळे दरवेळी आरोप झाला की राजीनामा घ्यायचा ही पद्धत योग्य नाही अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली. त्यामुळे झिरवाळांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच झिरवाळांचे प्रकरण थेट व्यवस्थेवर किंवा लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणारे नाही. ते त्यांच्या खासगी आयुष्याचा भाग असल्याचा विचारही यामागे केला गेला असावा.

Narhali Zirwal
Ashok Kharat Scam: खळबळजनक! अशोक खरातच्या 'मायाजालात' अडकले बडे मासे; SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस, धक्कादायक महिती समोर!

शिवाय नुकताच खरात प्रकरणात चाकणकरांचा राजीनामा झाला आणि आता झिरवाळांचा राजीनामा घेतल्यास एकाच महिन्यात दोन राजीनामे पक्षाला कोणत्याच दृष्टीने योग्य नाही. हे पक्षाच्या प्रतिमेला तडा देणारे व पक्ष बॅकफूटवर येण्याचे कारण बनू शकते. याशिवाय मंत्री झिरवाळ यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधून आपली बाजू मांडली आहे. हा जो व्हिडिओ आहे तो तीन-चार व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे असा दावा त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी झिरवाळ यांना अधिकृत तक्रार करण्याचा सल्ला दिला असून, सदर व्हिडीओची सत्यता तपासली जाईल असे सांगितले आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करूनच पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने झिरवाळांना तुर्तास तरी अभय मिळालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com