PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांनी उच्चारले वाजपेयींचे 'ते' वाक्य!

Narendra Modi Politics, prime ministers clear message for women safety-जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा भर महिला सुरक्षेवर होता.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मोदी यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. त्यांचे हे भाषण एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे राज्य सरकारला महिला सुरक्षेबाबत स्पष्ट संदेश दिला. या महिला आणि विद्यार्थिनी वरील अत्याचाराची पापाची मानसिकता कायमस्वरूपी नष्ट करणे, हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी केंद्र शासन कठोर कायदे करीत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान (कै) अटल बिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील गाजलेल्या भाषणातील एक वाक्याचा जवळपास जसाच्या तसा पुनरूच्चार केला. वाजपेयी म्हणाले होते, "सरकारे आयेंगी, जायेंगी, बनेगी, बिगडेंगी, मगर ये देश रहना चाहिए".

या वाक्याची आठवण मोदी यांच्या भाषणांतील वाक्याने झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला सुरक्षा आपला प्राधान्य क्रम आहे, असे सांगताना म्हणाले, "सरकारे आती रहेगी, जाती रहेगी, लेकिन महिला सुरक्षा हमारा प्राधान्यक्रम होना चाहिये"

Prime Minister Narendra Modi
JP Gavit politics: संतप्त आदिवासी म्हणाले, मंत्री विजयकुमार गावित कुठे गायब झाले?

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार. बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार. त्यावरून समाजात निर्माण झालेला संताप याचे प्रतिबिंब दिसले.

राज्यातील विरोधी पक्षांकडून गेले काही दिवस सातत्याने बदलापूर येथील अत्याचाराची घटना व त्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. यातील आरोपीला फाशी द्यावी, अशी आंदोलन करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात याचा आवर्जून उल्लेख केला. नुकतेच केंद्र शासनाने कायदे कठोर केले आहेत. त्यात सुधारणा झाल्या आहेत. त्यामध्ये अत्याचाराच्या घटनेत फाशी आणि जन्मठेपेची तरतूद आहे, असे ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi
Narendra Modi: लखपती दीदी बदलणार गावांची अर्थव्यवस्था ; PM मोदींकडून कौतुक

पंतप्रधान मोदी यांचे जळगाव येथील कार्यक्रमातील भाषण ऑनलाईन उपलब्ध होते. यावेळी अनेकांनी हे भाषण ऑनलाईन ऐकले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून, महिला सुरक्षा आणि विशेषतः #Justiceforakshta या ट्रेडचा पाऊस पडत होता. त्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून दिसून आली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com