Ajit Pawar Politics: अजित पवार राज्याचे अर्थमंत्री, त्यांच्या राष्ट्रवादीला महायुती सरकारवर भरोसा नाय काय?

NCP Ajit Pawar, followers took signature campaign for government schemes-राज्य सरकारच्या योजना यापुढेही सुरू राहाव्यात यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष राबवतोय राज्यात मोहीम
Ajit Pawar, NCP
Ajit Pawar, NCPSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar news: महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांचा पाऊस पाडला आहे. या योजनांची अंमलबजावणी देखील सुरू आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनांबाबत सुरू केलेली मोहिम चर्चेचा विषय आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यात अनेक महिलांना आर्थिक लाभ मिळाला. अद्यापही या योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी सुरू आहे.

मात्र विरोधकांकडून याबाबत नकारात्मक प्रचार केला जातो. नागरिकांना ही योजना निवडणुकीपुरतीच आहे, असा संभ्रम आहे. या संदर्भात विरोधी पक्षाकडून देखील सातत्याने सरकार विषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

या योजनेसाठी सरकारी तिजोरीत निधी नाही, असाही अपप्रचार आहे. या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे राज्यभर मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही मोहीम वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

Ajit Pawar, NCP
Dhanraj Mahale : धनराज महालेंचे झिरवाळांना आव्हान, तुमचा पराभव मीच करणार!

नाशिक शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या पुढाकाराने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. त्यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला आघाडी तर्फे देखील प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अशीच मोहीम राबविण्यात आली.

महिलांमध्ये या योजनांबाबत माहिती देणे आणि या योजना यापुढेही सुरू राहाव्यात या मागणीसाठी आम्ही ही मोहीम राबविल्याचे सौ बलकवडे यांनी सांगितले. प्रत्येत तालुक्यात याबाबत पक्षाच्या महिला आघाडीने ही मोहीम हाती घेतली आहे.

राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह मोफत गॅस सिलेंडर योजना, युवा प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, अन्नपूर्णा योजना, गाव तिथे गोदाम योजना, मोफत तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना, लेक लाडकी योजना अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत.

Ajit Pawar, NCP
Bachchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, 'एमआयएम'ची धार्मिकता पचविण्यापलीकडे, तिसऱ्या आघाडीत स्थान नाही!

या योजनांबाबत निवडणुकीत त्याचा लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार व्यक्त केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनांचा थेट संबंध विधानसभा निवडणुकीची जोडला जात आहे. त्यामुळे त्याला राजकीय स्वरूप आले आहे.

याबाबत विरोधकांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट क्रियाशील झाला आहे. या संदर्भात उद्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ महिलांची साखळी केली जाणार आहे. यामध्ये पक्षाचे विविध पदाधिकारी देखील सहभागी होतील, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. येत्या महिनाभरात विधानसभेच्या निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर अशी मोहीम राबविल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे. राज्य सरकार या योजना बंद करण्याचा विचार तर करत नाही ना? असा देखील संदेश या माध्यमातून जाऊ शकतो.

त्या दृष्टीने राज्य सरकारवर राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण करण्यासाठी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या एका पक्षाने ही मोहीम राबविल्याचा नेत्यांचा दावा आहे. महायुतीच्या अन्य घटक पक्षांकडून याबाबत काय धोरण स्वीकारले जाते याचीही या निमित्ताने उत्सुकता आहे. मात्र यातून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाच आपल्या सरकारवर विश्वास नाही काय? असा संदेश जाऊ शकतो.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com