Narhari Zirwal Politics: गुरु श्रीराम शेटे जिल्हा परिषदेसाठी कोणाची बाजू घेणार? मंत्री झिरवाळ की खासदार भगरे यांची?

Narhari Zirwal; Sharad Pawar to Lok Sabha, Ajit Pawar to Vidhan Sabha, now who will be the Zilla Parishad candidate? The test-मंत्री नरहरी झिरवाळ आणि खासदार भास्करराव भगरे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांचे शिष्य
Narhari Zirwal, Bhaskar Bhagre & Shriram shete
Narhari Zirwal, Bhaskar Bhagre & Shriram sheteSarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal News: दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आणि आघाडीचे सर्वच पक्ष जिल्हा परिषदेसाठी दावेदार आहेत. या प्रत्येक पक्षाचे नेते प्रबळ होऊ लागले आहेत. नेत्यांतील या वादाचा लाभ मंत्री नरहरी झिरवळ यांना होईल का? याची सध्या उत्सुकता आहे.

दिंडोरी तालुक्यात कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम शेटे यांच्या भूमिकेला प्रत्येक निवडणुकीत महत्त्व असते. श्रीराम शेटे हे शरद पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे, जिल्हाध्यक्ष दत्तू पाटील आणि अजित पवार पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळ या तिघांचेही राजकीय गुरू मानले जातात. त्यामुळे हे गुरु कोणत्या शिष्याला कौल देतात आणि पाठीशी उभे राहतात याला महत्त्व आहे.

दिंडोरी तालुक्यात बहुसंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे आहेत. मात्र या कार्यकर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सोयीनुसार कधी शरद पवार तर कधी अजित पवार गटाकडे झुकतात. हे सर्व कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे भास्करराव भाकरे यांच्याबरोबर होते. विधानसभेला हेच कार्यकर्ते अजित पवार पक्षाचे अर्थात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसले.

Narhari Zirwal, Bhaskar Bhagre & Shriram shete
Dr Ashok Uike Politics: आदिवासी बिऱ्हाड मोर्चा... सरकारने ठेकेदारांना मोठे करणे थांबवावे!

दिंडोरी तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आहेत. या प्रत्येक गटात एका पक्षाचा प्रबळ नेता निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. यामध्ये खेडगाव हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष दत्तू पाटील आणि सुरेश डोखळे या नेत्यांचा गट आहे. खासदार भगरे येथील माजी सदस्य आहेत. त्यामुळे या गटात शरद पवार पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

मोहाडी गटात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रवीण जाधव आणि जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे हे स्थानिक नेते आहेत. वनी गटात शिवसेना ठाकरे पक्षाचे विलास निरगुडे आणि विलास कड यांचा प्रभाव आहे. कोचरगाव गटात पूर्वश्रमीचे काँग्रेसचे मात्र सध्या अजित पवार यांच्याबरोबर गेलेले अशोक टोंगरे हे विद्यमान सदस्य आहेत.

अहिवंतवाडी गट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रभावक्षेत्रात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार धनराज महाले हे देखील दावेदार मानले जातात. विशेष म्हणजे महाले यांनी वरिष्ठांच्या दबावामुळे विधानसभा निवडणुकीला नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात उमेदवारी मागे घेतली होती. त्याची परतफेड करण्याचा राजकीय दबाव मंत्री झिरवाळ यांच्यावर असेल.

दिंडोरी तालुक्यात सहा गटांमध्ये सहा पक्षांचे प्रबळ दावेदार आहेत. या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभागणी झाली. या निमित्ताने नव्या नेतृत्वाला अर्थात तरुणांना अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदंड पक्ष आणि प्रबळ प्रस्थापित नेत्यांतील वाद मंत्री झिरवाळ यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com