NCP Sharad Pawar : शरद पवारांकडून झिरवळांच्या नावावर फुली? दिंडोरीत देणार नवा चेहरा?

Sharad Pawar, Narhari Zirwal दिंडोरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपाध्यक्ष शरद पवार गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. मात्र सध्या त्यांचे समर्थक या निर्णयाने अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे झिरवळ कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार याची उत्सुकता वाढत आहे.
Sharad Pawar, Narhari Zirwal
Sharad Pawar, Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Dindori Constituency News: नरहरी झिरवळ सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र मतदारसंघात पडद्याआडून वेगळ्याच राजकीय हालचाली सुरू आहेत.

दिंडोरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपाध्यक्ष शरद पवार गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. मात्र सध्या त्यांचे समर्थक या निर्णयाने अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे झिरवळ कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार याची उत्सुकता वाढत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. या निवडणुकीत उमेदवार कोण हा निर्णय सर्वस्वी शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे यांच्यावर सोपविण्यात आला होता. भास्कर भगरे हे पक्षाचे एकनिष्ठ आणि पेशाने शिक्षक तसेच नवखे उमेदवार होते.

खासदार भगरे यांच्या नावाला शेटे यांची संमती होती. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण? याचा निर्णय देखील शेटे यांच्या कलानेच ठरेल, हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत वारंवार चर्चेत येणारे तीन चार इच्छुक आणि त्यांची उमेदवारी यावर कार्यकर्ते आणि नेते सगळ्यांचीच नापसंती आहे.

Sharad Pawar, Narhari Zirwal
Dashrath Patil Politics : दशरथ पाटील करणार नाशिकच्या रस्त्यांचे ऑडिट; हायकोर्टाने घेतली दखल

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP) गटाकडून नवा चेहरा देण्याचे प्रयत्न आहेत. या संदर्भात माजी सरपंच संतोष रेहरे हे नाव पुढे आल्याचे बोलले जाते. अद्यापही अन्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे दिंडोरीची यंदाची निवडणूक अतिशय वेगळी ठरण्याची चिन्हे आहेत.

विद्यमान आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे अजित पवार गटात आहेत. त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र त्यात कितपत यश येईल याविषयी सगळ्यांनाच शंका आहे.

Sharad Pawar, Narhari Zirwal
Kishore Darade Politics: "एकनाथ शिंदे हे तर देव", दुसऱ्यांदा आमदार झालेल्या दराडेंना साक्षात्कार

माजी आमदार धनराज महाले आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivsenaUBT) पक्षात असलेले रामदास चारोस्कर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या दोघांचीही सातत्याने पक्ष बदलण्याची परंपरा आहे. या परंपरेमुळे हे नेते सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला दिंडोरीत जागा वाटपात स्थान नसेल. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह अन्य इच्छुकांची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com