Nashik ACB News : लाच स्वीकारण्यात नाशिक महाराष्ट्रात 'अव्वल'...

Accepting bribes : वर्षभरात विभागात विविध घटनांत स्वीकारली 2 कोटी 15 लाखांची लाच.
ACB
ACB Sarkarnama
Published on
Updated on

Nashik ACB News : मावळत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला. त्यामुळे नाशिक लाच स्वीकारण्यात आणि कारवाईत अव्वल ठरले आहे. नाशिक मध्ये कोटीत लाच मागितली जाते. त्यामुळे हे शहर सध्या महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट शहर ठरले आहे.

मावळत्या वर्षात नाशिक (Nashik) शहर वेगळ्याच कारणाने संबंध महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे. तरीही त्यामुळे कौतुक किंवा अभिमान करावा याऐवजी मान खाली घालावी अशी स्थिती आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नाशिक विभागात शंभराहून अधिक लाच घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर सापळे लावले. त्यात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

ACB
Nitin Karir : पुण्यात 'BRT'चं जाळं निर्माण करणारे अन् सायकल ट्रॅकचीही संकल्पना मांडणारे नितीन करीर!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग याबाबत अधिक बदाम ठरला. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना अटक करण्याबरोबरच त्यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा प्रचंड संपत्ती जमा केल्याचे आढळल्याने गुन्हा (Crime) देखील दाखल करण्यात आला आहे.

नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई बरोबरच लाच मागण्यातही सगळ्यात पुढे असलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. सिन्नर येथील एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि अधिकारी गणेश वाघ यांनी एका प्रकरणात 1 कोटी रुपयांची लाच मागितली ही लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.

लाच मागितल्याने तसेच स्वीकारल्याने सहकार आणि शिक्षण विभाग सर्वात बदनाम झाला सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाख रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. सिन्नर येथील सहाय्यक उपनिबंधकांना वीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली. नाशिकच्या शिक्षण विभागातील लाचखोरी प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून हा विभाग अत्यंत बदनाम झाला आहे.

या विभागात कारवाई झाल्यानंतर येणारे नवे अधिकारी देखील त्याच भ्रष्ट मार्गाने पुढे जात असल्याने सलग तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यामुळे या विभागात रुजू झाल्यावर अधिकाऱ्यांनी 'मी शिक्षण विभागात काम करतो हे सांगण्याची लाज वाटते' असे विधान केले होते. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे देखील लाचखोरीच्या प्रकरणांमुळे व्यतीत झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. नाशिक विभागातील कारवाई आणि प्रशासनातील रुजलेल्या लाच स्वीकारण्याच्या या प्रकरणामुळे हा भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे की काय अशी स्थिती आहे. विभागात 161 खटले दाखल झाल्याने नाशिक यामध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे.

वर्षभरात 2 कोटी 15 लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. यामध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिकच्या एसीबीच्या कारवाईची राज्यभरात चर्चा आहे. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि अप्पर अधीक्षक माधवी रेड्डी यांच्या टीमने ही कारवाई केली.

(Edited by Amol Sutar)

ACB
Nagpur : राज्य सरकारला ‘चुल्लुभर’ पाण्यात बुडून मरायची वेळ.. कोण म्हणालं असं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com