ACB Action News: महसूल विभाग लाचखोरीत राज्यात अव्वल; वर्षभरात तब्बल 'एवढे' गुन्हे दाखल

Pune and Nashik ACB : लाचखोरीच्या कारवाईत यावर्षी नाशिक एसीबी युनीट राज्यात अव्वल
ACB News:
ACB News:Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri : राज्यात यावर्षी 'एसीबी'ने 803 केसेस केल्या असून त्यात त्यांचे नाशिक रेंज युनीट आघाडीवर आहे. तर, गेल्या वर्षासारखे यावर्षीही महसूल खाते राज्यात लाचखोरीत एक नंबरवर राहिले आहे. मात्र, त्यात बडे मासे गळाला लागण्याचे प्रमाण अवघे दहा टक्केही नसून वर्ग तीनचे कर्मचारी सर्वात जास्त पकडले गेले आहेत.

158 लाचखोरीच्या केसेस करून 2022 मध्ये एसीबीचे पुणे रेंज युनीट राज्यात एक नंबरवर होते. पण, 2023 मध्ये असे 163 गुन्हे नोंदवून नाशिक एसीबी युनीटने हा मान पुण्याकडून हिसकावून घेतला. त्यामुळे यावर्षी पुणे युनीट दोन नंबरवर गेले आहे. युनीट प्रमुख तथा एसपी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या दमदार कामगिरीमुळे नाशिकच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ACB News:
Pawar-Ambedkar Meeting : मोदी बागेत पवार-आंबेडकर भेट? चर्चांना एकच उधाण...

यावर्षी राज्यात 803 लाचखोरीचे गुन्हे नोंद झाले असून त्यात एक हजार एकशे सत्तर आरोपी आहेत. सर्वाधिक 163 गुन्हे हे नाशिक रेंज एसीबी युनीटने 274 लाचखोरांविरुद्ध दाखल केले आहेत. दुसऱ्या नंबरवर दीडशे लाचखोरीच्या केसेस करणारे पुणे युनीट आहे. त्यांनी 2022 ला असे 158 गुन्हे नोंदवले होते. तर, 192 आरोपीविरुद्ध असे 130 गुन्हे नोंद करणारे नाशिक दुसऱ्या क्रमाकांवर होते.

छत्रपती संभाजीनगर युनीटने गेल्यावर्षाप्रमाणे यावर्षीही तिसरा नंबर कायम ठेवला आहे. 2022 ला राज्यात लाचखोरीची 747 प्रकरणे उघडकीस आली होती. यावर्षी त्यात दहा टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, 2014 ला 1316 एवढ्या विक्रमी संख्येने या केसेस झाल्या होत्या. तो आकडा गेल्या नऊ वर्षात राज्य 'एसीबी'ला पार करता आलेला नाही.

महसूल विभाग लाच घेण्यात आघाडीवर

2022 प्रमाणे 2023 मध्येही राज्यात महसूल विभागाने लाचखोरीत आपला दबदबा आणि एक नंबर कायम ठेवला आहे. गेल्या वर्षी या विभागात पावणेदोनशे या केसेस झाल्या होत्या. यावर्षी तो आकडा दोनशेच्या घरात (195) गेला आहे. पोलिस खाते यावेळी 143 केसेससह दुसऱ्या क्रमांकांवर आहे. एकूण लाचखोरांत 54 क्लास वन अधिकारी असून हे प्रमाण दहा एकूण लाचखोरांच्या टक्केही नाही. त्यांच्यात वर्ग तीनमधील सर्वाधिक 589 कर्मचारी, तर 'क्लास टू'चे 131 आहेत.

नाशिक युनीटने यावर्षी बडे मासे गळाला लावले, हे त्यांच्या कारवाईच्या कामगिरीचे वैशिष्ट ठरले. तर, पुणे युनीटला, मात्र त्या आघाडीवर तेवढे यश मिळाले नाही. छोटे मासे पकडण्यापुरती त्यांची कारवाई सिमीत राहिली. नाशिक रेंज एसीबी युनीट हद्दीतील नाशिक, नगर, नंदूरबार, जळगाव, धुळे या पाचपैकी नाशिक, तर पुणे रेंजमधील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाचपैकी पुणे जिल्ह्यात लाचेचे सर्वाधिक ट्र्रॅप झाले आहेत.

(Edited By Ganesh Thombare)

ACB News:
Pune News: फडणवीसांकडून पुणेकरांची बोळवण! आश्वासन हवेतच विरले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com