Congress Politics : संतप्त हेमलता पाटील यांनी भर बैठकीत दिले नेत्यांना आव्हान !

Hemlata Patil Politics : काँग्रेसचे निरीक्षक ब्रिजकिशोर दत्त यांच्या उपस्थितीत विधानसभा तयारीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत इच्छूक उमेदवार हेमलता पाटील यांनी ...
Hemlata Patil - Brijkishor Datta
Hemlata Patil - Brijkishor DattaSarkarnama

Congress News : आगामी विधानसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसची बैठक झाली. मात्र नाशिकची ही बैठक वेगळ्याच कारणाने गाजली. या बैठकीत वेळी एका महिला इच्छुक उमेदवाराने भर बैठकीत इशाराच देऊन टाकला.

काँग्रेसचे निरीक्षक ब्रिजकिशोर दत्त यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्याची बैठक झाली. यावेळी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत नाशिक मध्य मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक डॉ.हेमलता पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थेट आव्हानच दिले.

काँग्रेसच्या (Congress) प्रदेश प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका डॉ. पाटील यांनी केलेला संताप आणि वादविवादाने ही बैठक चांगलीच गाजली. बैठकीला सुरुवात होतानाच डॉ. पाटील यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे, अशा अफवा कोण पसरवतो?अशी विचारणा त्यांनी केली.

त्यांचा हा रुद्रावतार पाहून पक्षाचे निरीक्षक दत्त हे देखील अचंभित झाले. डॉ.पाटील पुढे म्हणाल्या, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या सोबत माझी बैठक झाली, अशी खोटी माहिती पसरविली जात आहे. याबाबत मला पक्षाचे नेते विचारणा करतात.

Hemlata Patil - Brijkishor Datta
Congress Politics : जिल्हाध्यक्ष म्हणतात,'देणगी द्या काँग्रेसची उमेदवारी मिळवा'

कोणी कितीही प्रयत्न केले, तरी माझी उमेदवारी निश्चित आहे. तुम्ही सगळे मिळून ठरवले तरी उमेदवारी मलाच मिळेल, असे आव्हान देत अशाच आशयाचे भाषण त्यांनी केले. कोणाच्या ध्यानीमनी नसताना हा प्रसंग घडल्याने उपस्थित सगळेच अवाक झाले. त्यानंतर त्या तडक निघून गेल्या. त्यामुळे बैठकीच्या प्रारंभीच सगळे वातावरणच बदलले.सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी बराच वेळ या गोष्टीची चर्चा करीत होते.

Hemlata Patil - Brijkishor Datta
Congress Politics : जिल्हाध्यक्ष म्हणतात,'देणगी द्या काँग्रेसची उमेदवारी मिळवा'

यावेळी जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल,शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक राहुल दिवे,अल्तमश शेख, हनीफ बशीर, विजय पाटील, बबलू खैरे, स्वप्निल पाटील, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर काळे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत (Election) चर्चा केली.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com