Nashik Crime : डीएनए अहवाल ठरला निर्णायक ; नाशिकमधील 'त्या' अत्याचार प्रकरणात नराधमाला जन्मठेप!

Convict sentenced to life in Nashik rape case: नाशिकच्या बागलाण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर पीडितेने स्वतःला संपवलं होतं.
Nashik court awards life imprisonment
Nashik court awards life imprisonmentSarkarnama
Published on
Updated on

Nashik sessions court judgment: नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैगिंक अत्याचार करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटनेत मालेगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी सुनील रामदास जाधव याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यात ‘डीएनए’ अहवाल निर्णायक ठरला असून, वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने आरोपीला त्याचा नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर या गावात नोव्हेबर २०२१ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात आरोपीने १३ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप होता. सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पीडितेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती.

धक्कादायक म्हणजे, शवविच्छेदनात ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. आगीत होरपळलेल्या तिच्या गर्भाचाही यात मृत्यू झाला होता. सटाणा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, गर्भातील नमुन्यांची डीएनए तपासणी करण्यात आली. या अहवालात आरोपीच गर्भाचा जैविक पिता असल्याचे निष्पन्न झाल्याने तो खटल्यातील सर्वांत भक्कम आणि निर्णायक पुरावा ठरला.

Nashik court awards life imprisonment
Nashik Crime : पती-पत्नी नसतानाही राहायचे एकत्र; नाशिकमध्ये हॉटेलात कूक म्हणून काम, पोलिसांनी दोन बांग्लादेशींचा डाव उधळला

या खटल्याचे कामकाज मालेगाव येथील विशेष पोक्सो कोर्टात चालले. विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी सरकारी पक्षाने सादर केलेले वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरत आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३७६ (३) अंतर्गत जन्मठेप, कलम ३०६ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी, तसेच पोक्सो कायद्यातील विविध कलमांन्वये नैसर्गिक मृत्यूपर्यंत सक्तमजुरी, तीन वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची शिक्षा सुनावली.

Nashik court awards life imprisonment
Nashik Crime : धक्कादायक! सोने डबल करून देण्याचे आमिष; माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाला 200 तोळ्यांचा गंडा

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राहुल गर्वे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील संजय सोनवणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी देखरेख ठेवली.

पोलिस शिपाई चंद्रकांत दवंडे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी विशेष परिश्रम घेतले. वैज्ञानिक पुरावे, काटेकोर तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणी यांच्या बळावर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात न्याय मिळाल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com