Girish Mahajan Politics : भाजपच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांना गिरीश महाजन यांचा कानमंत्र; निवडून आलात, आता कामातून नावलौकिक वाढवा!

Nashik- BJP-Girish Mahajan-Newly- elected- corporators-Group-Registration-Concentrate-on Devolopment-जळगाव आणि अहिल्यानगरच्या भाजप नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली, आता महापौरपदाच्या राजकारणाला येणार गती.
Girish Mahjan
Girish MahjanSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics News : महापालिका निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पक्षनेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली. आज जळगाव आणि अहिल्यानगर महापालिकेच्या गटनेत्यांची निवड झाली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांच्या भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक नाशिकला झाली. यावेळी मंत्री महाजन यांनी प्रमुख नगरसेवकांशी व्यक्तीशः चर्चा केली. त्यानंतर नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

नाशिक, जळगाव, धुळे आणि आहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी पक्षाला भरघोस मतदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आता मतदारांचे हित जोपासण्यासाठी परिश्रम घ्यावे.

Girish Mahjan
MD Drugs Case LCB Police Arrest : फडणवीसांच्या खात्याच्या कारभाराची लक्तरे! अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज शिरूरमध्ये, ‘स्थानिक’च्या प्रतापानं गृहखातं हादरलं

शहराच्या विकास कामातून आपल्या पदाचा नावलौकिक वाढवावा, असा कानमंत्र मंत्री महाजन यांनी दिला. जळगाव, आहिल्यानगर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी गटनेता निवड केला. त्याची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली. या नगरसेवकांनी शहर भाजप कार्यालयात नगरसेवकांची भेट घेतली.

Girish Mahjan
Malegaon Mayor Politics: इस्लाम पक्षाची मोठी खेळी; काँग्रेस, ‘एमआयएम’ला झुलवणार आणि दादा भुसेंना जवळ करणार?

यावेळी जळगाव महापालिकेत निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांमधून गटनेता उपघटनेता व प्रतोदपदाची निवड मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महापौरपदाच्या हालचाली गतीमान होतील.

जळगाव महानगरपालिकेत प्रकाश बलाणी यांची गटनेता, नितीन बरडे यांची उपगटनेता आणि प्रतोद पदी डॉ चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार राहुल ढिकले ,आमदार सीमाताई हिरे, जळगावचे आमदार राजू मामा भोळे आदी नेते उपस्थित होते. या नेत्यांनी देखील नगरसेवकांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये जनतेने मोठ्या विश्वासाने भाजपच्या हाती महानगरपालिकेची सूत्रे दिली आहेत. त्यामुळे मतदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. राज्या शासन नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव पाठीशी असेल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

महानगरपालिका निवडणूक मध्ये झालेला विजय हा निश्चितच भारतीय जनता पक्ष येणारा निवडणुकीमध्ये अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . जनतेसाठी शंभर चकरा शासकीय कार्यालयात माराव्या लागल्या तरी चालतील मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे. लवकरच या नगरसेवकांची कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग घेण्यात येईल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com