BJP Politics : कारवाईचा धडाका सुरूच; भाजपने माजी महापौरांसह २१ माजी नगरसेवकांना दाखवला बाहेरचा रस्ता!

Nashik BJP Girish Mahajan Politics : मतदानाच्या एक दिवस आधीच भाजपने बंडखोरी करणाऱ्या स्वकीयांवर पुन्हा एकदा कारवाई करत आणखी 22 जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला ‘ऑपरेशन लोटस’चा मोठा फटका बसला आहे.

  • माजी महापौर, दोन माजी सभागृह नेते आणि 21 माजी नगरसेवकांसह एकूण 76 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

  • आयारामांना प्रवेश दिल्याने निष्ठावंतांमध्ये असंतोष निर्माण होऊन बंडखोरी उफाळून आली आहे.

NMC Election News : नाशिक महापालिका निवडणुकीत 'ऑपरेशन लोटस' म्हणत भारतीय जनता पक्षाने यंदाच्या महापालिका निवडणुकीत अन्य पक्षातील अनेकांना रेड कार्पेट अंथरले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेला त्यात प्राधान्य देण्यात आले. या धोरणाचा फटका आता पक्षाला बसताना दिसत असून महापालिका निवडणुकीत दुखावलेल्या अनेक निष्ठवंतांनी थेट पक्षालाच आव्हान निर्माण केले आहे. ज्यामुळे आता भाजपने आणखी 22 जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ज्यात माजी महापौरांसह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या कारवाई नंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

निवडणुक जाहीर होण्याच्याआधीच इच्छुकांनी कंबर कसली होती. निष्ठनं काम करणाऱ्यांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. ज्यात माजी महापौरांसह दोन माजी सभागृह नेत्यांचाही समावेश होता. तर त्यांच्यात हमखास निवडून येण्याचा आत्मविश्वास ही होता. मात्र ऐन वेळी उमेदवारीचा अधिकार असलेल्या अनेकांना पक्षाने घरी बसवले. यामुळे माजी महापौरांसह दोन माजी सभागृह नेत्यांसह तब्बल 76 जणांना भाजपच्या या निर्णयाला थेट आव्हान दिले. तर आता महापालिका निवडणुकीला एकच दिवस बाकी असताना भाजपने कारवाईचा धडका लावला आहे.

माजी महापौर अशोक मुतडक यांसह माजी सभागृह नेते सतीश बापू पाटील, शशिकांत जाधव यांच्या प्रभागात भाजपने अन्य पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली. परिणामी या नेत्यांनी पक्षाला आव्हान देत अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. या सर्वांनी अन्य पक्षातून उमेदवारी घेत थेट भाजपलाच आव्हान दिले होते.

Girish Mahajan
BJP Politics: मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपचा धाडसी निर्णय; पर्यावरण प्रेमी रोहन देशपांडे यांना बाहेरचा रस्ता!

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 100 प्लस अशी घोषणा महापालिकेसाठी दिली होती. त्याला भाजपच्याच काही नेत्यांनी बंडखोरी करीत अडथळा आणला. यामध्ये 21 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. भाजपने पहिल्या टप्प्यात 15 नेत्यांना निलंबित केले होते. नंतर ही संख्या 54 झाली. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना आणखी 22 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. भाजपने पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करीत अन्य महाराजांना देखील कठोर संदेश दिला आहे.

पक्षाने कारवाई केलेल्यांमध्ये शहराचे सरचिटणीस अमित घुगे तसेच प्रमुख माजी नगरसेवकांमध्ये रुची कुंभारकर, सुनीता पिंगळे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, अनिल मटाले, दामोदर मानकर, वंदना मनचंदा, कन्हैया साळवे आधी २१ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये उमेदवारीच्या अपेक्षेने अन्य पक्षातून भाजप प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे.

इंदिरानगर भागातील माजी सभागृह नेते सतीश बापू सोनवणे हे गेली तीन टर्म नगरसेवक होते. मात्र येथे अजिंक्य साने या भाजपच्या नेत्याच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये सोनवणे यांना घरी बसविण्यात आले. त्यामुळे भाजप निष्ठावंतांत मोठा असंतोष होता. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यावर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.

छावा संघटनेचे करण गायकर, माजी महापौर दशरथ पाटील यांनी सातपूर येथील प्रभागात उमेदवारीची दावेदारी केली होती. या ठिकाणी ऐनवेळी मनसेचे प्रदेश सचिव आणि भाजपवर प्रखर टीका करणारे दिनकर पाटील यांना प्रवेश देऊन त्यांच्यासह मुलगा अमोल पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे सविता पाटील आणि माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव यांना ऐनवेळी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा आधार घ्यावा लागला.

नव्याने निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये बहुतांशी पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते आणि निष्ठावंतांचा समावेश आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना भाजपने गनिमी काव्याने ही कारवाई केली आहे. त्याचे पडसाद मतदानावर उमटतात का याची आता मोठी उत्सुकता आहे.

Girish Mahajan
BJP Politics: भाजपकडून वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीची जामखेडच्या स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक! तुषार आपटे प्रकरणाची पुनरावृत्ती का?

FAQs :

1. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला अडचण का आली आहे?
आयारामांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांना डावलल्यामुळे भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे.

2. भाजपने किती माजी नगरसेवकांवर कारवाई केली आहे?
एकूण 76 माजी नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

3. या कारवाईत कोणकोणाचा समावेश आहे?
माजी महापौर, दोन माजी सभागृह नेते आणि 21 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

4. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे काय?
इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची रणनीती ‘ऑपरेशन लोटस’ म्हणून ओळखली जाते.

5. या बंडखोरीचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
भाजपच्या मतविभाजनावर आणि निवडणूक निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com