BJP Politics: भाजपकडून वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीची जामखेडच्या स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक! तुषार आपटे प्रकरणाची पुनरावृत्ती का?

BJP Politics: हा प्रकार म्हणजे अत्यंत गंभीर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींना राजकारणात संधी देऊन त्यांना अधिक मजबूत करण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.
Walmik Karad_Ram Shinde_Rohit Pawar
Walmik Karad_Ram Shinde_Rohit Pawar
Published on
Updated on

BJP Politics: भाजपनं बदलापूरच्या तुषार आपटे स्विकृत नगरसेवक प्रकरणाची पुनरावृत्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोक्काच्या गुन्ह्याखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या एका विश्वासू व्यक्तीला भाजपनं अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये स्विकृत नगरसेवक म्हणून नेमणूक केली आहे. हा प्रकार म्हणजे अत्यंत गंभीर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींना राजकारणात संधी देऊन त्यांना अधिक मजबूत करण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.

Walmik Karad_Ram Shinde_Rohit Pawar
Sharad Pawar Politics : आमदारकी गेली, नगराध्यक्षपदासाठीही धडपडले... माजी आमदार आता शरद पवारांना सोडून शिवसेनेच्या वाटेवर?

विधानपरिषदेचे सभापती आणि भाजप नेते राम शिंदे यांनी वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याला जामखेडचा स्विकृत नगरसेवक करण्याचा घाट घातला. स्विकृत नगरसेवक बनलेली व्यक्ती शेजारच्या मतदारसंघातील आमदारांची देखील विश्वासू आहे, असा नाव न घेता सूचकपणे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे सर्वसामान्यांच्या वेदनांचा बाजार असून या प्रवृत्तीचा जाहीर निषेध असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Walmik Karad_Ram Shinde_Rohit Pawar
Raju Patil Vs BJP : रवींद्र चव्हाणांच्या मोठ्या मित्राच्या वक्तव्याला राजू पाटलांचे सणसणती उत्तर, म्हणाले, 'एन्काऊंट...'

रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं की, "दिवंगत संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडचा अत्यंत विश्वासू व्यक्तीला जामखेडच्या स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक करून बदलापूरच्या तुषार आपटे प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा सभापती राम शिंदे सरांचा मानस आहे का? गुन्हेगार आणि गुन्हेगारांशी संबंधित व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक करण्याचा भाजपने चंग बांधलाय का? चांगली लोकं सापडत नाहीत का? सदरील स्वीकृत नगरसेवक शेजारील आमदार महोदयांचा देखील विश्वासू आहे, हे सर्व बघता सर्वसामान्यांच्या वेदनांचा देखील बाजार मांडला जातो का? असा प्रश्न पडतो! असो अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध!"

Walmik Karad_Ram Shinde_Rohit Pawar
PADU machine with EVM : निवडणूक आयोगाचं नवं प्रयोगशस्त्र! PADU मशीन बसवल्यानं राजकारणात खळबळ; विरोधकांचा संताप

दरम्यान, बदलापूरमधील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मोठा जनक्षोभ उसळला होता. लोकांनी उत्फुर्तपणे रेल रोकोसह ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. याच प्रकरणातील एक आरोपी जो या शाळेशीसंबंधित पदाधिकारी आहे, तो म्हणजे तुषार आपटे. याला भाजपनं बदलापूर नगरपरिषदेत स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती केली होती. पण हे कळताच त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानं भाजपला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. स्वतः तुषार आपटे यानं स्वतःहून बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडं आपला राजीनामा सोपवला आणि या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com