Nashik Politics : 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणणाऱ्यांकडूनच गुन्हेगारांच्या कुटुंबियांचे उमेदवारी देत पुनर्वसन!

Nashik Municipal Election : सत्ताधारी पक्षाचे नेते विक्रम नागरे यांच्यावर खुनासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मातोश्री उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे सातपूर प्रभागात सातपूर प्रभागातील हे उमेदवार चर्चेचा विषय आहेत. भाजपने याबाबत गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांबाबत मवाळ धोरण स्वीकारल्याची स्थिती आहे.
Nashik municipal election
Police action against criminals was highlighted before the Nashik municipal election, but controversial leaders and their families now dominate the political battlefield.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 02 Jan : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आकाश पाताळ एक केले. मात्र निवडणूक जाहीर होताच याच गुन्हेगारांना प्रस्थापित करण्याची धडपड सुरू झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आणि खून यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. सत्ताधारी पक्षाच्या राजकीय आशीर्वादातून गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या विरोधात मैदानात उतरले. या संदर्भात भाजप तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने निवडणुकीपूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

बहुतांशी गुन्हेगार खाटू श्यामच्या मंदिरात देवाचा धावा करत असल्याचा दावा नेत्यांनी केला होता. महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर मात्र राजकीय पक्षांचे खरे चेहरे पुढे आलेत. कारागृहात गेलेल्या नेत्यांना दिलासा देण्यासाठी स्थानिक नेत्यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे कारागृहात असलेल्या या नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या दिलासा मिळाला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे यामध्ये प्रमुख आहेत. त्यांनी कारागृहातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या कुटुंबातील माजी नगरसेविका ही उमेदवारी करीत आहेत. त्यांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची सहानुभूती असल्याचे बोलले जाते.

Nashik municipal election
BMC Election : 'मिंध्यांनो थुत तुमच्या जिनगानीवर! मुंबईचा महापौर उत्तर भारतीय, हीच भाजपची भूमिका; पण सत्ता भोगणारी शहांची बुटचाटी सेना; ठाकरेंचा हल्लाबोल

सत्ताधारी पक्षाचे नेते विक्रम नागरे यांच्यावर खुनासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मातोश्री उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे सातपूर प्रभागात सातपूर प्रभागातील हे उमेदवार चर्चेचा विषय आहेत. भाजपने याबाबत गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांबाबत मवाळ धोरण स्वीकारल्याची स्थिती आहे.

माजी नगरसेवक उद्धव निमसे सध्या कारागृहात आहेत. त्यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी देऊन पुनर्वसन केले आहे. सिडकोतील बहुचर्चित सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपने त्यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित आरोप केले होते. नितेश राणे यांनी केलेल्या या आरोपांनी विधिमंडळात गदारोळ झाला होता.

Nashik municipal election
Dynastic Politics : महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा कहर; पतीला ठाकरेंची उमेदवारी, पत्नीला शिंदेंच्या शिवसेनेचे तिकीट!

मात्र गमतीचा भाग म्हणजे सुधाकर बडगुजर यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या पत्नी आणि मुलालाही भाजपची उमेदवारी मिळाली. ही उमेदवारी मिळण्यासाठी भाजपच्याच एका उमेदवाराचा राजकीय बळी दिला गेला.

दोन महिन्यांपूर्वी शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांच्या कारवाईचे श्रेय घेण्याची धडपड सत्ताधारी पक्षात होती. आता मात्र याच वादग्रस्त नेत्यांच्या कुटुंबीयांवर राजकीय आशीर्वाद बरसत आहेत. हे नेते जोमाने प्रचाराला लागल्याने, नाशिकची निवडणूक चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com