BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

BJP corporator demands 300 crore fund for ward development: भाजपच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या एका नगरसेविकेने मागण्या करताना आमदार, खासदारांनाही मागे टाकले!
Maharashtra BJP internal politics and development funds 2026
Maharashtra BJP internal politics and development funds 2026Sarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC News: गेले काही दिवस राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्याने 'विकास' हा शब्द परवलीचा झाला आहे. कोटींच्या योजना सामान्य बनल्या आहेत. त्याचा प्रशासनाला कसा झटका बसतो याचे उदाहरण नुकतेच नाशिक महापालिकेत घडले.

नाशिक महापालिकेत भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार कामाला सुरुवात झाली आहे. महापौर हिमगौरी आडके आणि प्रशासन अंदाजपत्रकाच्या आकडेमोडीत व्यस्त आहे.

या पार्श्वभूमीवर चक्रावून टाकणारी घटना महापालिकेत घडली आहे. झोपडपट्टी बहुल प्रभागातून भाजपच्या एक तरुण नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यांनी केलेल्या मागण्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला. त्या पूर्ण करायच्या तरी कशा? हा प्रश्न उभा राहीला आहे. 

Maharashtra BJP internal politics and development funds 2026
Onion Farmers Crisis 2026: खासदार बोलले, पण संसदेच्या गदारोळात कांदा उत्पादकांचा आवाज सरकार ऐकणार का?

सध्या महापालिका प्रशासन आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागाला विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. याची कुणकूण लागल्याने अतिउत्साही नगरसेवकांनी आपल्या मागण्या भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यात या नगरसेविकेने धमाल उडून दिली.

Maharashtra BJP internal politics and development funds 2026
Jalgaon Mayor 2026: जळगाव महापालिकेच्या चाव्या भाजपाकडे; उद्धव ठाकरेंची शिवसेना उरली नावाला!

या नगरसेविकेने महापालिका क्षेत्रात भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचा परस्पर निर्णय घेतला. त्यासाठी दरही निश्चित केला. ती जागा संपादित करून झोपडपट्ट्यांना पर्यायी घरे देण्याची घोषणा करून टाकली. 

खरे तर भूसंपादन प्रक्रिया ही प्रशासनाच्या अखत्यारीतील आहे. अधिकारी महसूल विभागाने निश्चित केलेल्या नियमानुसार संपादन करतात. तत्पूर्वी संपादन गरजेचे आहे का? याचा विचार होतो. मात्र या सर्व प्रशासकीय अधिकारावर नगरसेविकेने स्वतःच त्यावर अतिक्रमण केले आहे.

एव्हढेच नव्हे तर, संत कबीर नगर या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना अंघोळीसाठी गरम पाणी देण्याची घोषणा केली आहे. साठी सोलर यंत्रणा उभारून प्रत्येकाला गरम पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यासाठीचा मोठा निधी महापालिकेने द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निधी महापालिकेला राखून ठेवावा लागणार आहे. साठी महापालिकेने कर्जरोखे उभारण्याची तयारी केली आहे. तिजोरीची स्थिती 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास'अशी असताना भाजपच्या या नवख्या नगरसेविकेने अधिकाऱ्यांना अक्षरशा घाम फोडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com