Congress News : काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक समन्वयकपदी नाशिकचे छाजेड

Nashik Congress President Akash Chhajed appointed on National minority cell-नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्ती.
Akash Chhajed
Akash ChhajedSarkarnama
Published on
Updated on

Nashik Congress News : अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या समन्वयकपदी नाशिक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे. (Nashik`s Akash Chhajed go appointment on national lavel)

नाशिक (Nashik) शहर काँग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष आकाश छाजेड यांची पक्षाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक (Minority) सेलच्या समन्वयकपदी फेरनियुक्ती झाली आहे.

Akash Chhajed
Maratha Reservation News : आमदार कोकाटेंच्या बालेकिल्ल्यात पसरले गावबंदीचे लोण!

अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अध्यक्ष खर्गे यांच्या मान्यतेनुसार बुधवारी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. छाजेड यापूर्वी गोवा राज्याचे प्रभारी होते. सध्या सुरू असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी अल्पसंख्याक विभागाच्या कामकाजासाठी त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या नियुक्तीमुळे नाशिक शहर काँग्रेसला नवी संधी मिळाली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागात नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये समन्वयकपदी नाशिक शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचा समावेष आहे. अन्य समन्वयकांमध्ये एच. एम. शकील नवाझ, उमर खान, जीनल निकुज गाला, एच. मोहंमद आरीफ आणि डॉ. रफीक अहमद एस. यांचा समावेश आहे.

उपाध्यक्षपदी पुढील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अनिरुद्ध ललित जैन, अन्वर अहमद अन्सारी, फरहान आझमी, रुबी खान, महेंदरसिंग वोहरा, अनिल थॉमस, मोहंमद अहमद खान, शहनवाझ शेख, अशपाक उल्लाह खान, इकबाल वलीयावीतील, डी. के. ब्रीजेश.

Akash Chhajed
Jayant Patil : मोदींजी, तुम्ही खुशाल श्रेय घ्या ! जयंत पाटलांचा टोला; 'निळवंडे'च्या कामाची करून दिली आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com