Maratha Reservation News : आमदार कोकाटेंच्या बालेकिल्ल्यात पसरले गावबंदीचे लोण!

Manoj Jarange Indefinite Hunger Strike : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सिन्नर तालुक्यात नेत्यांना गावबंदीचे वारे जोरात आहे.
Manikrao Kokate
Manikrao Kokate Sarkarnama

Sinner Maratha issue News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापासूनच सिन्नर तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते. आता त्याला विविध गावांतून समर्थन मिळत आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Ruling Party MLAs are in Trouble due to Maratha reservation Issue)

सिन्नर (Siiner) तालुक्यात मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे फलक झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात त्याला मोठा प्रतिसाद आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manikrao Kokate
NCP Thane News : शरद पवार गटातील 'त्या' पदाधिकाऱ्यांची परांजपेंनी नावे केली उघड; 'यांना माणसंही...'

४० दिवसांनंतरही सरकारचे मौन

आरक्षणाचा प्रश्न सध्या संवेदनशील बनला आहे. याबाबत राज्य सरकारने एक महिन्याची मुदत घेतली होती. ४० दिवस झाल्यानंतरदेखील शासन या विषयावर मौन आहे. त्यामुळे या आंदोलनाबाबत शासन उदासीन असल्याचा संदेश ग्रामीण भागात गेला आहे.

वावी (सिन्नर) येथील जगद्‌गुरू तुकाराम महाराज मंदिराच्या सभागृहात मराठा समाजबांधवांची बैठक झाली. या वेळी राज्य शासनाकडून या आंदोलनाबाबत उदासीनता असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या मागणीसाठी आता राजकारणविरहित लढा उभारण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत आहे. पक्ष, संघटनांना बाजूला ठेवून आरक्षणाचा हा अखेरचा लढा सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. जरांगे-पाटील यांच्याकडून आंदोलनाची दिशा ठरविल्यानंतर मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानुसार मराठा समाजबांधवांनी आपापल्या भागात आंदोलन करून आरक्षणासाठी एकत्रित योगदान द्यावे, असा सूर होता. मराठा आरक्षण आंदोलनात फूट पाडण्याचा घाट सध्या घातला जात आहे. काही नेते समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्यं करीत आहेत. नेत्यांनी आरक्षणासाठी एकत्र आलेल्या मराठा समाजबांधवांना फितवू नये, असा इशाराही देण्यात आला.

तालुक्याच्या पूर्व भागातील वावी, पांगरी, सायाळे, मलढोण, मीरगाव, दुशिंगपूर, पिंपरवाडी, कहांडळवाडी, घोटेवाडी, फुलेनगर (माळवाडी), निऱ्हाळे, मीठसागरे, मऱ्हळसह परिसरातील मराठा समाजबांधव बैठकीला उपस्थित होते. हा परिसर आमदार कोकाटे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथेच आंदोलनाचा जोर असल्याने राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी होऊ लागली आहे.

Manikrao Kokate
Jayant Patil : मोदींजी, तुम्ही खुशाल श्रेय घ्या ! जयंत पाटलांचा टोला; 'निळवंडे'च्या कामाची करून दिली आठवण

या वेळी बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले, रमेश पांगारकर, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, वावीचे सरपंच विजय काटे, पांगरीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, संपत पगार, बाजार समितीचे संचालक कृष्णा घुमरे, किशोर महाराज खरात, पिंपरवाडीचे माजी सरपंच अण्णा काकड, सुनील काटे, बापूसाहेब घोटेकर आदींनी मनोज जरांगे यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

Manikrao Kokate
Maratha reservation : सरकारची नवी खेळी : मराठा आरक्षण आंदोलनाची आक्रमकता कमी करण्यासाठी ‘बुद्धिभेदाची’ मात्रा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com