Ajit Pawar News: नवी खेळी? बारामती लोकसभेसाठी आता अजित पवारदेखील उमेदवार...

Baramati Lok Sabha Constituency 2024: बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी कोणताही दगा फटका होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News: आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha Constituency 2024) पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकामेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची बनली आहे.

या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) उमेदवार आहेत, तर महायुतीने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) हे स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झालेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही कोणती नवी खेळी आहे का? असा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७ मे रोजी बारामतीसाठी, तर १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत, तर २० एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होईल, आणि २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

महायुतीचे तिन्ही उमेदवार 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार, पुण्यातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकत्र अर्ज दाखल करणार आहेत.

Ajit Pawar
Madha Lok Sabha 2024: निंबाळकरांच्या नको त्या उठाठेवीमुळे मोहिते पाटील स्वगृही, शरद पवारांना बळ

उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यामध्ये मोठी जाहीर सभादेखील होणार आहे. सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणारच आहेत. मात्र, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी कोणताही दगा फटका होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून अजित पवार हे महायुतीचे डमी उमेदवार असणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Sunetra Pawar News: त्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी जोडले हात

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये, म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून स्वतः अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com