Nashik Constituency Election : हेमंत गोडसेंच्या प्रचारात रंग भरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे होणार सक्रीय!

Hemant Godse news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बुधवारी महायुतीची समन्वय बैठक
Eknath Shinde- Hemant Godse
Eknath Shinde- Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 News: नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ग्रामीण भागातील प्रचारावर भर दिला आहे. गोडसे यांच्या प्रचारात महायुतीचे सर्व घटक पक्ष सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना बुधवारी अधिक चालना मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज झाले. या पार्श्वभूमीवर उर्वरित महाराष्ट्रातील प्रचारावर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांनी भर दिला आहे. यामध्ये आता स्टार प्रचारकांनी किल्ला लढविण्यासाठी जोरदार दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde- Hemant Godse
Utkarsha Rupwate: वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या वाहनावर हल्ला, हल्लेखोर फरार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) बुधवारी (ता.8) नाशिकचा दौरा करणार आहेत. नाशिक आणि शिर्डी मतदार संघातील प्रचारात सहभागी होतील. नाशिक येथे महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी अद्याप प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे बुधवारी दुपारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वयाची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होईल.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतील. पुढील आठवड्यातील महायुतीचे उमेदवार गोडसे यांच्या प्रचाराचे नियोजन गतिमान करण्यासाठी सर्व नेत्यांना सहभागी करण्याचे काम या बैठकीतून होईल. त्यामुळे हेमंत गोडसे(Hemant Godse) यांच्या प्रचारात रंग भरण्यासाठी आता थेट मुख्यमंत्री शिंदे सक्रिय झाले आहेत.

Eknath Shinde- Hemant Godse
Nashik Constituency 2024: मुख्यमंत्र्यांची विनंती झुगारत शांतिगिरी महाराजांची उमेदवारी कायम!

दरम्यान नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदार संघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची सभा होणार आहे. याशिवाय पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विविध महायुतीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्या दृष्टीने महायुतीच्या सर्व नेत्यांना प्रचारात सक्रिय करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com