Nashik Constituency 2024: मुख्यमंत्र्यांची विनंती झुगारत शांतिगिरी महाराजांची उमेदवारी कायम!

Mahayuti Sarkar : महायुतीचे खासदार हेमंत गोडसे यांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिकची निवडणूक आता चुरशीची होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांनीही असेच प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. शांतिगिरी महाराज यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.
Hemant Godse
Shantigiri Maharaj Sarkarnama
Published on
Updated on

Shantigiri Maharaj News: नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. महायुतीचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिकची निवडणूक आता चुरशीची होणार आहे.

नाशिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांची माघार व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली घडल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघातून शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) आणि त्र्यंबकेश्वर येथील योगेश्वर आनंद हे दोन साधू ही रिंगणात आहेत. या दोन्ही साधूंचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्री दादा भुसे आणि भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शांतिगिरी महाराज यांच्याशी चर्चा करून हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळावे, अशी विनंती केली. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विविध नेत्यांनीही असेच प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. शांतिगिरी महाराज यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

Hemant Godse
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' आहेत तिसऱ्या टप्प्यातील 'हाय व्होल्टेज' लढती!

शांतिगिरी महाराज यांचे अनुयायी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विखुरलेले आहेत. नाशिक मतदारसंघात त्यांनी घरोघर जाऊन प्रचार केला आहे. गेल्या एक महिन्यापासून शांतिगिरी प्रचार करीत आहे. शांतिगिरी यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाचे (Eknath Shinde) उमेदवार म्हणून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अनुयायानमार्फत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र शिंदे गटाने विद्यमान खासदार गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराज नाराज आहेत.

दरम्यान, शांतिगिरी महाराज यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून येणारा दबाव आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी केलेली विनंती याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या काही प्रतिनिधींनी देखील शांतिगिरी यांच्याकडे संपर्क केला होता. हिंदुत्ववादी मते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठिंबा मिळून उमेदवारी मागे घेऊन महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती शांतिगिरी यांनी स्पष्ट शब्दात झुगारली. त्यामुळे नाशिक मतदार संघात आता महायुतीचे खासदार गोडसे, महाविकास आघाडीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार शांतिगिरी आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) करण गायकर यांच्यात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Hemant Godse
Jalna Loksabha Constituency : मोदींनी तुमच्या-आमच्या सारख्यांच्या खिशातून पैसा घेतला अन् अदानी, अंबानीला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com