Ajit Pawar News: नगरपालिका निवडणुकीचा प्रचार काल संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाशिकला सभा गाजवल्या. मात्र त्यात अजित पवार यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आहे.
नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने कंबर कसून प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी लहान लहान गावांतही प्रचाराला गेले. आज कित्ता अजित पवार यांनीही गिरवला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगूर येथील सभेत महायुतीच्या सहकाऱ्यांनाच कान-पिचक्या दिल्या. आमच्या पक्षाचा आणि उमेदवारांचा अजेंडा केवळ विकास आहे. त्यामुळे विरोधकांना मुद्दाच राहिला नाही. मतदार त्यांच्याकडे पाठ फिरवतील.
राज्यातील सहकार आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार सातत्याने प्रयत्न करीत असतात. सत्तेचा उपयोग सहकारातील आपल्या नेत्यांना मदत करण्यासाठी ते पुढाकार घेत आले आहेत. त्यामुळे सहकार्यातील बहुतांश नेते सध्या तरी अजित पवार यांच्या भोवताली दिसतात.
भगूर येथील सभेत त्यांनी जिल्हा बँकेला केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला. बँकेला मदतीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्य शासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्हा बँक अडचणीतून बाहेर पडेल.
जिल्हा बँकेला अडचणीत आणणाऱ्या आमदारांना पुढच्या वेळी पुन्हा निवडून देऊ नका, असे धाडसी विधान त्यांनी केले. त्यांचे हे विधान नेमके कोणासाठी अशी चर्चा सुरू झाली. जिल्हा बँकेला अडचणीत आणणारे आमदार अन् नेते त्यावेळी व्यासपीठावर होते. त्यामुळे त्याची जाहीरपणे चर्चाही झाली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी बँकेला अडचणीत आणणाऱ्या उमेदवारांना पुन्हा निवडून देऊ नका. असे सांगितल्याने त्यांच्याच पक्षाच्या आमदारांची झोप उडाली आहे. निफाड नासिक सिन्नर आणि अन्य मतदार संघातील नेते सभा संपल्यावरही तीच चर्चा करीत होते.
जिल्हा बँक वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. बँकेची माहिती असलेल्या कार्यकारी संचालक देसले आणि अनिल चव्हाण, तुषार पगार या जाणकार मंडळाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र या मंडळाला बाजूला करण्यात आले. सरकार आणि सहकार यांच्यातील अधिकाऱ्यांना कारभार सोपवला.
सरकारच्याच काही निर्णयांनी बँक अधिक अडचणीत गेल्याची ही चर्चा आहे. राज्य सहकारी बँकेची निवडणूक टाळल्याने ती बँक सुस्थितीत आली. नाशिकच्या बँकेची मात्र २०१६ मध्ये निवडणूक झाली. त्या संचालक मंडळाचे निर्णय बँक अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांचा ठपका नेमका कोणावर हा चर्चेचा विषय बनला आहे.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.