Aditya Thackeray Politics: वृक्षतोडीच्या वादात आदित्य ठाकरेंची उडी, सत्ता काळातील ‘ ‘त्या’ निर्णयाची करून दिली आठवण!

Nashik Kumbh Mela Girish Mahajan Shiv Sena Aditya Thackeray Criticizes BJP on Tree Cutting-वृक्षतोडीच्या निर्णयाने भाजपच्या संकटमोचक गिरीश महाजन यांनी दिली विरोधकांना राजकारणाची आयती संधी
Aditya-Thackeray
Aditya-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray News: साधू ग्राम येथील वृक्षतोडीचा वाद काही केल्या थांबेना. भाजप विरोधकांना या निमित्ताने आयताच मुद्दा मिळाला आहे. मुळे सरकारला लक्ष्य करण्याची संधी ते सोडण्याची चिन्हे नाहीत.

साधू ग्राम उभारणीसाठी तपोवन येथील सतराशे झाडे तोडण्यात येणार आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या संदर्भात आग्रही आहेत. त्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप सरकारला घेरले. आता त्यात शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. आमदार ठाकरे यांच्या आरोपांना वेगळा संदर्भ आहे.

Aditya-Thackeray
MuktaiNagar Election : एकनाथ खडसेंचा संशयास्पद 'यु-टर्न'; 'मविआ'चे नेते अजूनही हँग : मुक्ताईनगरात भाजपला मतदानापूर्वीच 'बाय'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी कुंभमेळा हा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. सुमारे पंचवीस हजार कोटींचा निधी त्यावर खर्च केला जाणार आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा निधी उपलब्ध केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

Aditya-Thackeray
Ram Shinde Jamkhed election : 'एमआयडीसी'ला खोडा, ठाकरेंच्या शिलेदारांनी टायमिंग साधलं; हेडमास्तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांच्या ताफ्यासमोर जोरदार राडा

साधू ग्राम येथील सतराशे झाडे नेमकी कशासाठी तोडणार? असा संशय विरोधकांनी निर्माण केला आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी आधी केले मग सांगितले, असा दावा केला आहे. त्यांच्या भूमिकेला पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ही समर्थन दिले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शहरात उड्डाणपूल बांधण्यासाठी पुरातन वटवृक्ष तोडला जाणार होता. शिवसेना स्थानिक नेत्याचा त्यात इंटरेस्ट लपून राहिला नव्हता. कंत्राटदारांवर प्रेम करणारे हे नेते आता भाजप पक्षात दाखल झाले आहेत.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी संबंधित योजना रद्द करण्यात भाग पाडली. त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर रोपवे बसविण्यात येणार होता. साठी असंख्य पुरातन झाडे आणि जैवविविधता धोक्यात येणार होती. पर्यावरण मंत्री असलेल्या ठाकरे यांनी तो प्रकल्प ही रद्द करण्यास भाग पाडले.

त्यानिमित्ताने शिवसेना ठाकरे हा पक्ष पर्यावरणवादी आणि सामान्य जनतेच्या भावनांचा विचार करणारा आहे. आम्ही तसे निर्णय घेतले. मुळेच वृक्षतोडीला माझा विरोध राहील. भाजपचे पर्यावरण किंवा नाशिकवर नव्हे तर फक्त ठेकेदारांवर प्रेम आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

वृक्षतोडीचा बाद कुठल्याही परिस्थितीत थांबण्याची चिन्हे नाहीत. निमित्ताने महायुती सरकारने विरोधकांना टीकेला आयते कोलीत दिले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

____

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com