नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यासह काही निवडक मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांच्यासोबत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील हजारो मराठा कुटुंब आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
येत्या शनिवारी खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. त्यांना सक्रिय पाठिंबा देऊन त्याचे नियोजन करण्यासाठी येथील वरदलक्ष्मी लॉन्स येथे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून केवळ शाब्दिक आश्वासनांपलीकडे कुठलीही ठोस अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे नाशिकच्या समन्वयक तसेच समाजबांधवांनी याबाबत त्यांना सक्रीय पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पत वाढवून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे, सारथीसारखी संस्था सक्षम करून त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी मराठा तरुणांना पात्र बनविणे, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि न्यायालयाने निर्देशित केलेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ पूर्वलक्षी नियुक्त्या देणे, कोपर्डीच्या भगिनीला न्याय देण्यासाठी पूर्व निकालाला दिले गेलेले आव्हान खोडून काढण्यासाठी न्यायिक प्रक्रियेला वेग देणे अशा निवडक मुद्द्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यासाठी तीन समाजबांधवांची कमिटी स्थापन केली आहे. त्यासाठी अमित नडगे, सागर पवार व अमोल जगळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
बैठकीला करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, मनीषा पवार, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, विजय खर्जुल, अशिष हिरे, विलास जाधव, सचिन पवार, संदीप लबडे, बंटी भागवत, संजय सोमासे, विशाल कदम, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, शिवा तेलंग, खंडू आहेर, वंदना कोल्हे, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, पूजा तेलंग, पूनम पवार, सुनील भोर, शरद शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित होते.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.