फडणवीसांच्या स्टेजवर शिवसेनेचा स्कार्फ घालून बसलेल्या किरण दराडेंना शाबासकी!

शिवसेना नेत्यांनी कौतुक केलेल्या रणरागिणीची सोशल मिडीयावर धूम!
Devendra Fadanvis & Shivsena corporator Kiran Darade
Devendra Fadanvis & Shivsena corporator Kiran DaradeSarkarnama

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत सिडको येथे झालेल्या महापालिकेच्या (NMC) कार्यक्रमाची सोशल मिडीयावर धूम आहे. त्याला निमित्त ठरल्या आहेत त्या शिवसेनेचा स्कार्फ परिधान करून नगरसेविका किरण दराडे (Kiran Darade) या व्यासपीठावर होत्या. अगदी मुख्यमंत्र्यांच्या मागेच त्या बसल्याने भाजप नेत्यांची चुळबुळ सुरु झाली. शेवटी श्री. फडणवीस यांनी चणाक्षपणे आपली जागा बदलली.

Devendra Fadanvis & Shivsena corporator Kiran Darade
अडीच कोटींचा निधी परत गेल्याने कृषी सभापतींचे अधिकाऱ्यांविरुद्ध बंड

एका वाहिनीने या नगरसेविकेच्या धाडसाचे चांगलेच कौतुक केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेषतः भाजपमधील काही नेत्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढून सौ दराडे यांच्या उपस्थितीचा वेगळा अर्थ पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्वीटरवरील फडणवीसांच्या कार्यक्रमात शिवसेनेचा स्कार्फ परिधान केलेले छायाचित्र थेट शिवसेना नेत्यांनी रिट्वीट केले. त्याबाबत शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी त्याची दखल घेत रीट्वीट करीत त्यांचे कौतुक केले. अन्य नेत्यांनीही त्याचे कौतुक केल्याने आज आज दिवसभर शहरात हे छायाचित्र चांगलेच चर्चेचा विषय़ ठरले.

Devendra Fadanvis & Shivsena corporator Kiran Darade
शिवसेनेनेच्या निवडणुक कोअर कमिटीत विलास शिंदे, विनायक पांडेंची नियुक्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. हा कार्यक्रम जरी महापालिकेचा असला तरीही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम असल्याने त्यांनी सगळे वातावरण भाजपमय होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला होता. त्याला शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे- दराडे यांनी शिवसेनेचे नाव असलेली पट्टी गळ्यात घातल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

दरा़डे यांचा तो अविर्भाव पाहून भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांनीही थोडासा धसकाच घेतला. कारण श्री. दराडे यांना तशी पार्श्वभूमी देखील आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शहरातील भाजपच्या कार्यालायवर चालून गेलेले बाळा दराडे हे त्यांची पती होत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com