BJP leader Uddhav Nimse: भाजपला धक्का, खून प्रकरणात माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन फेटाळला.

Nashik Crime; BJP leader Uddhav Nimse's bail rejected in Rahul Dhotre murder case-महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राहूल धोत्रे खून प्रकरणाच्या पोलिस तपासावर उच्च न्यायालयाचे ताशेरे
Uddhav-Nimse
Uddhav-NimseSarkarnama
Published on
Updated on

Nashik crime News: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. शहरातील राहुल धोत्रे या गाजलेल्या खून प्रकरणात भाजपला दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. याबाबत तपासावर पोलिसांवर देखील उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.

एक महिन्यापूर्वी नांदूर नाका परिसरात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सशस्त्र हल्ला करीत भर रस्त्यात धोत्रे याचा खून केला होता. त्यावरून नाशिक शहरात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले.

आता निमसे यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा न्यायालयात देखील जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे पोलीस भाजप नेते निमसे यांना अटक करणार का? आणि केव्हा? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपच्या अन्य नेत्यांनीही मतप्रदर्शन करण्याचे टाळले होते.

Uddhav-Nimse
NCP Sharad Pawar: छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीचे नेते म्हणावे, ‘आमचा पराभव ईव्हीएम मुळेच’

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मूळ आरोपींना अटक केली नव्हती. भाजपचे नेते उद्धव निमसे यांनाही पोलिसांनी अटक करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप होत आहे. या सर्व विषयांवर उच्च न्यायालयाने तीव्र ना पसंती व्यक्त केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज भाजप नेते उद्धव निमसे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत देखील न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यामुळे या प्रकरणावरून आता पोलीस देखील अडचणीत आले आहेत.

महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे हे भाजपचे नेते असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली नाही असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी पक्षाने केला होता. या विषयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलीस आयुक्तांनी दोन दिवसात संबंधितांना अटक केली जाईल असे आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात मात्र गेले महिनाभर भाजप नेते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. या कालावधीत ते शहरातच असल्याचा आरोप धोत्रे कुटुंबीयांनी केला होता. या खून प्रकरणामुळे वातावरण तापल्याने निमसे यांच्या घराला मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण घडल्याने निमसे यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे भाजपलाही हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सातत्याने आक्रमक होऊन आरोप करीत आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com