Nashik Crime : प्रकरण मिटवण्यासाठी भोंदू महेशगिरीच्या साथीदाराचा फोन, अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न

Krishna Chandgude : तक्रार मागे घेण्यासाठी आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती कृष्णा चांदगुडे चांदगुडे यांनी माध्यमांना दिली. पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
Krishna Chandgude,Maheshgiri
Krishna Chandgude,MaheshgiriSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर जिल्ह्यासह राज्यभरात भोंदूगिरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकामागोमाग एक भोंदूबाबाचे कारनामे समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील अशाच एका भोंदू महेशगिरी काकडे बाबावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटकही झाली असून पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशातच भोंदूगिरीतील तक्रार मागे घेण्यासाठी आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी माध्यमांना दिली आहे. याबाबत त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दिल्याचे सांगितले.

याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी स्वत: माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा महेशगिरीच्या साथीदाराने चांदगुडे यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. भोंदू बाबाच्या भाच्याने एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला मध्यस्थी घालून आपल्याला शुक्रवार (दि. २४) एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:५६ वाजता मोबाईलवर संपर्क केला. किरकोळ बोलल्यानंतर त्या व्यक्तीने महत्वाचे बोलण्यासाठी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर चांदगुडे यांनी भेटता येणार नाही, कॉलवरच बोला असे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने प्रकरण मिटवून घेण्यासाठी बाबाचा भाचा पैसे देवू इच्छित असल्याचे सांगितले.

त्यावर चांदगुडे यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. ही बातमी चांदगुडे यांनी अंनिस कार्यकर्ते व इंदिरानगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या कानावर टाकली. चांदगुडे यांनी याबाबत नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे पोलीसांनी सांगितल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.

“लाच घेण्याप्रमाणे लाच देणे देखील गुन्हा आहे. या प्रकारामुळे माझ्या व चळवळीच्या सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नये, हा संदेश देण्यासाठी तक्रार दाखल केल्याचे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com