
Sandeep karnik News: हिंदी चित्रपटांमध्ये एक वाक्य हमखास टाळ्या मिळवणारे असायचे. ते म्हणजे पोलीस के हात बहुत लंबे होते है. मात्र आता ही परिस्थिती राहिली नाही असे चित्र दिसू लागले आहे. विविध आमिषे दाखविणारे आणि आर्थिक फसविणुकीसाठी फ्रॉड कॉल आला नाही, असा माणूस शोधूनही सापडत नाही. हे सायबर भामटे दिवसभर आपले सावध टिपण्यासाठी कॉल करत असतात. यामध्ये अनेक नागरिक सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात. हा आता पोलिसांच्याही चिंतेचा विषय बनला आहे.
संबंध देशभर याबाबत धोक्याची घंटा आहे. त्याचा मोठा फटका गेल्यावर्षभरात नाशिककरांना बसला आहे. नाशिक शहरातील विविध नागरिकांना आणि अगदी राजकीय नेत्यांना देखील सायबर भामट्यांनी गंडवले आहे. गेल्या वर्षभरात नाशिक शहरात १०४ सायबर गुन्हे दाखल झाले आहे. यामध्ये ५५.४४ कोटींची फसवणूक झाली आहे. यातील फार थोड्या लोकांना नुकसान झाल्यावर पैसे परत मिळू शकले. त्यात प्रामुख्याने फ्रॉड कॉल आणि हाऊस रेस्ट असे प्रकार वरचेवर घडू लागले आहेत.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे लाभ मिळवून देण्याचे अमित दाखवून अनेक नागरिकांना गंडविण्यात आले आहे. विशेषता 13 प्रकार हाऊस अरेस्ट झाल्याचे उघडकीस आले आहे. यातील अनेक प्रकारात नागरिक फसवले गेल्यानंतर त्यांनी तक्रारीच केल्या नसाव्यात. असाही दावा आहे. यामध्ये १६.८४ कोटी रुपयांची फसवणूक झाली.
संदर्भात शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना सावध राहण्याविषयी आवाहन केले आहे. असे बोगस आणि बेनामी व फसवणुकीचे कॉल आल्यास नागरिकांनी तातडीने पुढील संवाद खंडित करावा. संबंधित वारंवार फोन करीत असल्यास सायबर सेलला तक्रार करावी. आपल्या जमा पुंजीची सुरक्षितता राखण्यासाठी सावधगिरीने व्यवहार करावेत, फसवणूक झाल्यास गप्प न राहता तातडीने पोलिसांना कळविणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सांगितले.
सायबर गुन्हेगार हा एक नवा वर्ग तयार झाला आहे. देशभरात कुठूनही कुठेही असे फोन करून फसवणुकीचे प्रकार होऊ लागले आहेत. त्यासाठी बँका आणि अन्य संस्थांकडून डेटा चोरीला जातो किंवा अधिकृतपणे मिळवला जातो. त्याचा गैरवापर करून हे भामटे फसवणूक करतात. फसवणूक झाल्यावर संबंधित दूरध्वनी क्रमांकाची चौकशी केल्यास तो कुठल्यातरी अज्ञात व्यक्तीच्या अथवा परदेशातून आल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पोलीस देखील तिथे पोहोचण्याची शक्यता कमीच असते. सायबर गुन्हेगारीमुळे पोलीस के हात आता खूप लांब राहिले नाहीत, असे म्हणावे लागेल. मात्र अशा गुन्हेगारीला सायबर सेलमधून माहिती तंत्रज्ञान आणि अन्य साधनांच्या मदतीने शोध घेणे शक्य आहे त्यासाठी लवकरात लवकर तक्रार केली तरच फायदा होतो.
नाशिक शहरात 2024 या वर्षात फ्रॉड कॉल द्वारे ११.२० लाख, हाऊस रेस्ट १६.८४ लाख, फेडेक्स ६७.१५ हजार, शेअर मार्केट फसवणूक २८.९३ लाख, ऑनलाइन खरेदी १.७६ लाख, नोकरी ३.८२ लाख, डेबिट आणि क्रेडिट कार्ड १ कोटी असे विविध प्रकारचे फसवणुकीचे प्रकार घडले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा दुरुपयोग करून व्हाईट कॉलर गुन्हेगारी अस्तित्वात आली आहे. जागरूकता आणि हुशारी याद्वारे नागरिक त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये यासाठी आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे हाच त्यावर उपाय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.