Ladki Bahin Yojana : मराठवाड्यातील 55 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज नामंजूर; हे आहे कारण...

Ladki Bahin Yojana Rejected Applications : राज्य सरकारनं सुरु केलेल्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणीत आता मराठवाड्यातील 55 हजार 334 लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होणार आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांची आता काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.

या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होत होते. पण आता याच महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. राज्य सरकारनं सुरु केलेल्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणीत आता मराठवाड्यातील 55 हजार 334 लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होणार आहेत.

मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 पैकी 55 हजार 334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत, तर 54 हजार 598 अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट आहे.

मराठवाड्यातील 55 हजार 334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) आठवा हप्ता मिळणार नाही. सध्या या विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू आहे.

Ladki Bahin Yojana
Vasant More : ठाकरे गटाचे नेते म्हणतात 'हमारा टायगर सेफ है, गेले ते कोल्हे अन्....'

दरम्यान, राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अपात्र बहिणांना या योजनेतून वगळण्याचे काम सुरुच आहे. आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana New Rules : नवे नियम, नव्या अटी; लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय!

काय आहेत नवी नियम?

  1. लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य केले आहे.

  2. तसेच राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  3. 'लाडकी'वर आता आयटीची नजर आहे. लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार आहे.

  4. लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे.

  5. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही

  6. जिल्हास्तरावरून फेरतपासणी करुन निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com